लाइव न्यूज़
 • 02:21 PM

  औरंगाबाद : विष देऊन कुटुंब संपवण्याचा प्रयत्न करणा-या फरार शेतक-यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

 • 02:15 PM

  मुंबई : भोईवाडा कोर्ट परिसरात तक्रारदाराने केला तिघांवर हल्ला, कोर्ट परिसरात तणावाचे वातावरण.

 • 02:06 PM

  सुखोई - 30 एमकेआय फायटर विमानातून ब्राम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

 • 01:58 PM

  कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक 1 येत्या काही दिवसात पादचा-यांसाठी बंद केला जाणार आहे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांची माहिती.

 • 01:49 PM

  पुणे - मनपा सभागृहात काँग्रेस - राष्ट्रवादीचा गोंधळ, तुकाराम मुंढे सभा अर्धवट सोडून गेल्यानं गदारोळ.

 • 01:37 PM

  अमेरिकन हवाई दलाचं विमान 11 प्रवाशांसहित पॅसिफिक महासागरात कोसळल्याची माहिती.

 • 01:36 PM

  ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी शहरात फलक लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी मनसेच्या 2 नेत्यांसह 10 जणांविरोधात गुन्हा. अभिजीत पानसे, राजू पाटील व जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांचा समावेश. महापालिकेचे अधिकारी मारुती गायकवाड यांची तक्रार.

 • 01:32 PM

  वर्धा : हिंगणघाट-गीमा टेक्स्टच्या वर्धा मार्गावरील 7 सीएसटी प्लान्ट बेला येथे सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान स्फोट, 3 कोटी रुपयांचे नुकसान. सुदैवाने जीवितहानी नाही.

 • 01:32 PM

  नाशिक : विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हा परिषद मुख्यालय येथे लाक्षणिक उपोषण.

 • 01:14 PM

  कोल्हापूर : वसतीगृहात राहत नसलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दरमहा शहरामध्ये 10 हजार व ग्रामीण भागात 8 हजार रुपये निर्वाह भत्ता देणार असल्याची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. ट्विटरवरुन दिली माहिती.

 • 01:04 PM

  अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण, खटल्याचा 29 नोव्हेंबरला होणार फैसला.

 • 01:03 PM

  गुजरातमध्ये भाजपा विरोधात लढण्यासाठी टीम्स बनवल्या आहेत, लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण करु - कपिल सिब्बल.

 • 12:54 PM

  सांगली : कौटुंबिक वादातून किसन शिंदेंची हत्या, शिंदेंच्या पत्नीला पोलिसांनी केली अटक, चक्रभैरव मंदिरात सापडला होता शिंदेंचा मृतदेह, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदेंची माहिती.

 • 12:50 PM

  अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण, तिन्ही दोषींना फाशीच हवी, उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद पूर्ण.

 • 12:46 PM

  अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण. क्रूर पद्धतीला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा गरजेची, अशा घटना होऊ नये म्हणून कठोर शिक्षा आवश्यक, कट रचणा-यालाही फाशीच योग्य - उज्ज्वल निकम

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या