शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात १२ आरामदायी बसेस, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:48 IST

विभागासाठी एकूण ३० गाड्या उपलब्ध होणार

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने बीएस ६ प्रणालीच्या नवीन बसेस उपलब्ध केल्या असून, रत्नागिरी विभागात एकूण १२ बसेस रविवारी दाखल झाल्या. रत्नागिरी आगारातील बसेसचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला.रत्नागिरी विभागासाठी एकूण ३० गाड्या उपलब्ध होणार आहेत. सध्या १२ गाड्या दाखल झाल्या असून, त्यापैकी पाच गाड्या रत्नागिरी आगार, तीन लांजा व चार राजापूर आगारात दाखल झाल्या आहेत. नवीन बसेस टू बाय टू आसनी असून आधुनिक व सीएमव्हीआर दर्जाच्या आहेत. १९७ अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन असून, बस रिअर एअर सस्पेन्शन सुविधा असलेल्या आहेत. या सर्व गाड्या महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत.रत्नागिरीतील रहाटाघर येथे आयोजित लोकार्पण सोहळ्याचा बहुमान पालकमंत्री सामंत यांनी महिला प्रवाशांना दिला. महिला प्रवाशांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बसेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्रचालन अभियंता अनंत कुलकर्णी, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, रत्नागिरी आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) संदीप पाटील उपस्थित होते. रत्नागिरी विभागातर्फे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पालकमंत्री सामंत यांचे स्वागत केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत