शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

घरफोडी प्रकरणातील आरोपीला १२ वर्षांची शिक्षा, गुहागरात ६ तर मुंबईत १० घरफोडीचे गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 16:52 IST

दिवसभर बंद असणाऱ्या घरांची टेहाळणी करत भरदिवसा घरफोड्या करणारा परशुराम विलास शेंडगे (रा. झोंबडीफाटा, गुहागर) याला गुहागर न्यायालयाने गुहागर तालुक्यात केलेल्या तीन घरफोड्यांच्या खटल्यामध्ये १२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर गुहागरात ६ तर मुंबईत १० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देघरफोडी प्रकरणातील आरोपीला १२ वर्षांची शिक्षागुहागरात ६ तर मुंबईत १० घरफोडीचे गुन्हेगुहागर पोलिसांनी लावला चोरीचा छडा

गुहागर : दिवसभर बंद असणाऱ्या घरांची टेहाळणी करत भरदिवसा घरफोड्या करणारा परशुराम विलास शेंडगे (रा. झोंबडीफाटा, गुहागर) याला गुहागर न्यायालयाने गुहागर तालुक्यात केलेल्या तीन घरफोड्यांच्या खटल्यामध्ये १२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर गुहागरात ६ तर मुंबईत १० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.परशुराम शेंडगे हा दिवसाढवळया घरफोड्या करत असे. सन २०१४पासून त्याने मुंबईत १० तर गुहागर तालुक्यात तब्बल ६ घरफोड्या केल्या आहेत. शृंगारतळी ते आबलोली रस्त्यावरील बंद घरांची तो दुचाकीवरून टेहाळणी करत असे. त्यानंतर घरात कोणीही नसताना कटावणी, स्क्रू ड्रायव्हर व पान्याच्या सहाय्याने घराचे कुलप व कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, वस्तूंची चोरी करीत असे. त्याला गुहागर पोलिसांनी सन २०१५मध्ये अटक केले होते.

शेंडगे हा चोरी करताना कोणताही पुरावा मागे न ठेवता, सराईतपणे घरफोड्या करीत असे. गुहागर पोलिसांना तो वेळोवेळी चकमा देऊन आपण काहीच करीत नसल्याचा आव आणत असे. अखेरीस गुहागर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी यांचे मदतीने त्याच्यावर पाळत ठेवून आधुनिक तंत्राचा वापर करून त्याला अटक केली. त्यानंतर बोलण्यात निष्णात असलेल्या या आरोपीकडून चोरी केलेला माल हस्तगत करण्यात गुहागर पोलिसांना यश आले होते.या गुन्ह्यांचा अधिक तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, विद्यमान पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम, जयंत शिंंदे, हेडकाँस्टेबल भास्कर मुंडोळा, तपास पथकातील पोलिस नाईक, शिपाई यांनी सखोलपणे करत परिपूर्ण पुरावे गोळा केले.

सरकारी वकील होडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून चोरीप्रकरणी परशुराम शेंडगे याला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.पैरवी अधिकारी पोलीस शिपाई जाधव यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच तसेच इतर पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या खटल्यात सरकारी पंचांची साक्षही महत्त्वाची ठरली.तालुक्यात अनेक ठिकाणी मारला डल्लापरशुराम याने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी शृंगारतळी-आबलोली रस्त्यालगत असलेल्या दत्ताजी आंबवकर यांच्या घरातील सुमारे १९ तोळे सोने असा ५ लाख ५० हजार रूपये किंंमतीचा मुद्देमाल, १७ जानेवारी २०१७ रोजी शीर - मधलीवाडी येथील मनोहर गुहागरकर यांच्या घरातील सोन्याचे ६ ग्रम वजनाचे दागिने व देव्हाऱ्यातील सुमारे ३२० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा सध्याच्या भावाप्रमाणे १ लाख किंंमतीचा मुद्देमाल तर ६ मे २०१६ ते १२ जून २०१६ या मुदतीत शीर आंबेकरवाडी येथील रूस्तम मौला मुल्ला यांच्या घरातील सोन्याची चैन, कर्णफुले, सोन्याच्या २ अंगठ्या असे सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने सध्याच्या भावाप्रमाणे ९० हजार किंंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाRatnagiriरत्नागिरी