शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकरांना दिलासा, तूर्तास पाणी कपात नाही

By मेहरून नाकाडे | Updated: April 16, 2024 13:59 IST

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा दि.१५ जूनपर्यंत पुरेल, ...

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा दि.१५ जूनपर्यंत पुरेल, असा विश्वास रत्नागिरी नगर परिषदेने व्यक्त केला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एक दिवस पाण्याचे संकट तूर्तास तरी निवारले आहे.रत्नागिरी शहरात ११ हजार २८८ नळजोडण्या आहेत. त्यांना दिवसाला २० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी तीन महिने आधीपासून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करून शहराला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दर सोमवारी व गुरुवारी पाणी कपात केली जात आहे. गतवर्षी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे दि. १५ एप्रिल (२०२३) पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. एकीकडे कडक उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. असे असले तरी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे उपलब्ध पाणीसाठा दि.१५ जून पर्यत पुरेल असा दावा रत्नागिरी नगर परिषदेने केला आहे. त्यामुळे एक दिवसा आड पाणी कपातीचे संकट लांबले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी