शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कुणी जागा देता का?, रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ आरोग्य उपकेंद्रांना स्वत:ची जागाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:42 IST

रहिम दलाल रत्नागिरी : ग्रामीण भागात गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या उपकेंद्रांना ...

रहिम दलालरत्नागिरी : ग्रामीण भागात गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या उपकेंद्रांना स्वत:ची हक्काची जागा नसल्याने भाड्याच्या जागेतून रुग्णसेवा करावी लागत आहे. जिल्ह्यातील १०१ उपकेंद्रे सध्या भाड्याच्या जागेत असून, या उपकेंद्रांसाठी जागेचा शोध सुरु आहे.ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रे ही गरजू व गरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरत आहेत. या उपकेंद्रांमध्ये किरकोळ उपचार करण्यात येत असले तरी रुग्णांना गरजेच्या वेळी त्यांचा उपयाेग हाेताे. मात्र, अनेक वर्षांपासून हंगामी सेवा बजावणाऱ्या या उपकेंद्रांच्या इमारतीसाठी कोणीही दानशूर जमीन देण्यास पुढे येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३७८ आरोग्य उपकेंद्रे मंजूर आहेत. २१८ उपकेंद्रांच्या हक्काच्या इमारती आहेत, तर १०१ इमारतींसाठी अजूनही जमीन मिळालेली नाही. या उपकेंद्रांच्या इमारत बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे जमीन खरेदी करणार कशी, असा प्रश्न निरुत्तर राहिला आहे.त्यासाठी जमीन विनामोबदला मिळाली आणि जागेचे बक्षीसपत्र केल्यानंतरच त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारता येणार आहे. जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांना कोणीही जमीन देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अजूनही या उपकेंद्रांसाठी काेणी जागा देता का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.किमान ५ गुंठे जागा५ गुंठे जमीन उपकेंद्रांसाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतींकडून मिळणे आवश्यक आहे. ज्या जमिनी बक्षीसपत्राने देण्यात आल्या आहेत, दानशूर व ग्रामपंचायतींनी १७ उपकेंद्रांना जागा दिली दिली आहे. या उपकेंद्रांना इमारती बांधकामाची शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे...तर स्थलांतर नक्कीशासनाच्या आदेशानुसार जमीन उपलब्ध होत नसल्यास ते उपकेंद्र जवळच्या गावात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हलविण्यात यावे, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या.

  • एकूण उपकेंद्रे - ३७८
  • उद्घाटनाभवी ताब्यात नसलेली उपकेंद्रे - ६
  • बांधकाम सुरू असलेली उपकेंद्रे - ६
  • मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली उपकेंद्रे - २३
  • जागा मिळालेली उपकेंद्रे - १७
  • स्थलांतर होणारी उपकेंद्रे - ७
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल