शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कळवंडे पंचक्राेशीतील १० हजार  ग्रामस्थ टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 19:24 IST

कळवंडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ निर्णयावर ठाम, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक ठरली निष्फळ

चिपळूण : तालुक्यातील कळवंडे धरणाची दुरुस्ती होत नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली असून, कळवंडे पंचक्रोशीतील १० हजार लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा अधिकारी, तहसीलदार व ग्रामस्थांची कळवंडेत गुरूवारी संयुक्त बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने चार गावांतील ग्रामस्थ निवडणुकीवरील बहिष्कारावर ठाम आहेत.कळवंडे येथील श्रीदत्त मंदिरात कळवंडे, पाचाड, कोंढे व रेहेळभागाडी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चढला होता. गुरूवारी दुपारी झालेल्या बैठकीला रत्नागिरीचे जलसंपदा विभागाचे जिल्हा अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, उपअभियंता विपुल खोत, तहसीलदार प्रवीण लोकरे, कळवंडेतील उद्योजक वसंत उदेग यांच्यासह पाचाड, रेहेळभागाडी, कोंढे आणि कळवंडे येथील शेतकरी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांनी धरण दुरुस्तीवरून संताप व्यक्त केला.

यावेळी तहसीलदार लाेकरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये. अधिकाऱ्यांनी जे तोंडी आश्वासन दिले, ते लेखी स्वरूपात दोन दिवसात दिले जाईल, असे सांगितले. उद्योजक वसंत उदेग यांनी सांगितले की, पावसाळ्यानंतरही दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. यावर्षीही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पुढच्या वर्षीही धरणात पाणीसाठा होणार नाही. त्यामुळे शेतीवर जगणाऱ्या येथील शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे? आम्हाला व्यवसायातून शासनाला जो जीएसटी भरावा लागतो, तो माफ करा. मी स्वतः धरणाची दुरुस्ती करून देतो, अशी सूचनाही त्यांनी केली. मात्र, त्यावर प्रतिक्रिया न देणेच अधिकाऱ्यांनी पसंत केले. शेवटी धरण दुरुस्तीबाबतचे आश्वासन मिळत नसल्याने ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवला आहे.

दुरुस्तीचा आराखडा तयारअधीक्षक अभियंता महेश सुर्वे म्हणाले की, कळवंडे धरणाची उभारणी करून ४० वर्षे झाली. पुढे आणखी ५० वर्षे धरण टिकण्यासाठी नियोजनपूर्वक दुरुस्ती करायला हवी. धरण दुरुस्तीबाबतचा कायदाही शासनाने केला आहे. संबंधित दुरुस्तीबाबतचा आराखडा तयार केला आहे. त्यानंतर कामाचे अंदाजपत्रक केल्यानंतर खर्चाची रक्कम निश्चित होईल. या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. कालव्याचे काम सुरू असताना ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना भरपाई देण्यात येईल. धरणापर्यंत रस्ताही केला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४