शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात १० योजना कोकणासाठी फायदेशीर; क्षेत्र कोणतं, फायदा काय..जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 12:41 IST

कोकण रेल्वेच्या विस्ताराची अपेक्षा

रत्नागिरी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ५ व्या अर्थसंकल्पात एकूण १० योजना कोकणासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या उपयुक्त आहेत. या योजनांची एकमेकांशी सांगड घालून जर इच्छुक उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि शासकीय संस्था यांनी समन्वयाने काम केले तर कोकणाचा खूप फायदा होऊ शकतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सादर झालेल्या या अर्थसंकल्पाला एकूण ७१ गुण मिळू शकतील.ज्या योजना कोकणासाठी प्रत्यक्ष उपयुक्त आहेत त्यात प्रामुख्याने लघू आणि सूक्ष्म उद्योग, कृषी क्षेत्राशी निगडित नवीन उद्योग, बंदरे व जलवाहतूक, मत्स्यशेती, तृणधान्य व कौशल्यविकास या क्षेत्रांचा समावेश आहे, तर अप्रत्यक्ष उपयुक्त क्षेत्रात अल्पबचत एजंट, रेल्वे, तिसऱ्या श्रेणीतील शहरांचा विकास आणि निर्यातप्रधान उद्योग यांचा समावेश होत आहे.केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या खात्याअंतर्गत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी क्रेडिट स्कीम घोषित करण्यात आली आहे. त्यासाठी ९ हजार कोटींची तरतूद आहे. याचा लाभ कोकणातील किमान ५०० तरुण उद्योजकांना मिळू शकेल. या अर्थसंकल्पातून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार असून, कृषी कर्ज आणि सहकारी उद्योग यांना मिळणारे लाभ लक्षात घेता कोकणात किमान १० सहकारी उद्योग सुरू करता येतील.किनाऱ्यावरील जहाज उद्योगासाठी खासगी सहभागाची घोषणा झाली आहे. त्यासाठी कोकणात ४ बंदरे विकसित होऊ शकतात. मच्छीमार आणि मत्स्यउत्पादन यासाठी ६ हजार कोटींची तरतूद आहे, तसेच कोळंबी उत्पादनासाठी आवश्यक खाद्यावरील सीमा शुल्क कमी केले आहे. त्याचा फायदा कोळंबी उद्योगाच्या विकासासाठी होईल. कोकण किनारपट्टीवर कोळंबी सापडण्याचे प्रमाण चांगले आहे. असंख्य लोक या क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो.कोकणात लागवड होणाऱ्या नाचणी आणि हरिक (कोडा गोल तांदूळ) यांना अच्छे दिन आले असून, येत्या पावसाळ्यात त्याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल, असे अपेक्षित आहे. तरुणांना परदेशी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून जो कौशल्यविकास कार्यक्रम राबविला जाणार आहे तो राबविण्यास सक्षम अशा १२ संस्था कोकणात आहेत. त्यामुळे कोकणातील तरुणांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. स्थानिक पातळीवर उद्योग आणि रोजगार नसल्याने परदेशी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजना आणि वरिष्ठ नागरिक ठेव योजना याची मर्यादा दुप्पट केली आहे. तसेच महिला सन्मान बचत योजना जाहीर केली आहे, त्याचा सुमारे ८०० महिला अल्पबचत एजंटांना वाढीव कमिशनच्या रूपाने थेट लाभ मिळेल. तिसऱ्या श्रेणीतील शहरांचा विकास या योजनेत कोकणातील ६ नगरपालिका समाविष्ट होऊ शकतात. आयात-निर्यात बँकेची (एक्झिम बँक) उपकंपनी स्थापून त्यामार्फत योजना राबविल्या जाणार आहेत. त्यातून कोकणात निर्यातप्रधान उद्योग वाढू शकतात.

कोकण रेल्वेच्या विस्ताराची अपेक्षारेल्वेच्या संदर्भातील नवीन योजनांची नक्की माहिती स्पष्ट झाली नसली तरी कोकण रेल्वेचा विस्तार आणि वर्षाअखेर खासगीकरण या दोन गोष्टी अपेक्षित आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBudgetअर्थसंकल्प 2023Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन