आठवड्याचे राशीभविष्य - 24 मार्च ते 30 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:16 AM2019-03-24T10:16:23+5:302019-03-24T10:16:57+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscopes 24 march to 30 march 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 24 मार्च ते 30 मार्च 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 24 मार्च ते 30 मार्च 2019

Next

मेष

 

आठवडयाच्या सुरुवातीस आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा व देवाण - घेवाणीत काळजी घेण्याचा सल्ला आपणास देत आहे. विशेषतः जर कोणाकडून पैसे घ्यावयाचे असले तर वाणीत सौम्यता राखावी. फुटकळ खर्च होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. जर सबसिडी, सरकारी शिष्यवृत्ती, टॅक्सचा परतावा इत्यादीसाठी प्रयत्न करत असलात तर त्यात फायद्याचे प्रमाण कमी राहील... आणखी वाचा

वृषभ

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी प्रकृतीमुळे आपण बेचैन व्हाल. तसेच २७ ते २९ दरम्यान सुद्धा प्रकृती नाजूकच राहील. त्यामुळे आपणास ह्या आठवडयात प्रकृतीकडे लक्ष द्यावेच लागेल. आपल्या प्रकृतीवरच आपली इतर कामे अवलंबून राहतील. आठवडयाच्या सुरुवातीस व्यापार - व्यवसाय किंवा नोकरीतील आपल्या कामात आपण प्रगती करू शकाल... आणखी वाचा

मिथुन

आठवडयाच्या सुरुवातीस आपण उत्साहित असाल. आपला कल विशेषतः मौजमजेकडे असेल. आपण भिन्नलिंगी संबंधांकडे विशेष आकर्षित व्हाल. आर्थिक आघाडीची सुरवात मिश्रफलदायी असली तरी लगेचच दुसऱ्या दिवसापासून स्थितीत सुधारणा होऊ लागेल. प्राप्तीत वाढ करण्यासाठी आपण नव्या जोमाने निर्धारित कामे पूर्ण कराल. आपले हितचिंतक व मित्र ह्यांची भेट होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कर्क 

आठवडा सुरुवातीपासूनच आपल्यासाठी उत्साहवर्धक राहील. धाडसी कार्ये करू शकाल. संतती संबंधी चांगली बातमी मिळू शकेल. मोठया संततीची प्रकृती उत्तम राहील. मंत्र साधनेत प्रगती होईल. गुरुकृपा होईल. मित्रांकडून लाभ होतील. गुरुसेवा किंवा त्यांचे सानिध्य घडेल. शरीरात नवीन जोम व आनंद प्रत्ययास येईल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल... आणखी वाचा

सिंह

आपले विचार सकारात्मक असतील. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखू शकाल. आपला कल भौतिक गोष्टींकडे राहील. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. संतती इच्छुकांना संतती प्राप्ती संबंधी चांगली बातमी मिळू शकेल. व्यवसायासाठी चांगला भागीदार मिळू शकेल. नवीन करार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे... आणखी वाचा

कन्या 

महिला वर्गानी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. कोणाशी वाद निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर मिळविण्यात अडचण निर्माण होईल. आर्थिक बाबतीत कोणावर ही विश्वास ठेवू नये. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आपल्या कामाची प्रशंसा होईल. प्राप्तीत वाढ होईल... आणखी वाचा 

तूळ 

आठवडयाची सुरुवात नवीन काम करण्याच्या प्रेरणेने होईल. आपले बौद्धिक स्तर उंचावल्याचे दिसून आल्याने आपण बौद्धिक कार्य किंवा चर्चेकडे ओढले जाल. त्याच बरोबर आपली रोमँटिक भावना वाढीस लागल्याने आपल्या प्रियव्यक्तीसह जास्तीत जास्त वेळ घालविण्याची आपली इच्छा होईल. आपणास साहित्याची सुद्धा गोडी लागेल... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवडयाची सुरुवात दुर्बल आहे. पहिल्या दिवशी कोणत्याही कारणाने आपले मन व्याकुळ होईल. ताण, थकवा किंवा शारीरिक अस्वस्थता ह्यापैकी काहीही त्यास कारणीभूत ठरू शकेल. पहिल्या दिवशी अनावश्यक खर्चामुळे आपण त्रासून जाल. प्रियपात्रास आपले प्रेम व्यक्त करण्यात किंवा आपले मन मोकळे करण्यात विलंब होऊन हातून संधी गेल्यास आश्चर्य वाटण्याजोगे काही राहणार नाही... आणखी वाचा 

धनु 

आठवडा आपल्यासाठी सुखदायी ठरेल. ह्या आठवडयात शारीरिक, मानसिक व आर्थिक सशक्तपणा लाभेल. आपल्या मित्रां द्वारा काही लाभ होतील. अचानक भेटी होतील. आपल्या प्रियव्यक्तीशी संबंध दृढ होतील. दीर्घकाळ प्रेमालाप चालूच राहतील. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी किंवा प्रियव्यक्तीशी शारीरिक जवळीक साधू शकाल. एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना अनुरूप होण्यासाठी अनुकूलता लाभेल... आणखी वाचा

मकर 

महिन्यातील हा आठवडा आपल्यासाठी चांगला असल्याचे एकंदरीत ग्रहांच्या भ्रमणावरून दिसत आहे. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी बदलण्यास अनुकूल असा हा आठवडा आहे. एखादा नवीन कंत्राट सुद्धा मिळवू शकाल किंवा त्या संबंधीची निविदा भरल्यास त्यात अचानकपणे यश मिळवू शकाल. शेअर्स बाजारातील व्यवहारात योग्य निर्णय घेतल्याने खरेदी - विक्रीत प्राप्ती वाढ होईल... आणखी वाचा 

कुंभ

आठवडयाच्या सुरुवातीस आपण मनाने खूप हळवे व्हाल. शारीरिक स्वस्थतेमुळे आपला उत्साह वाढेल. शेजाऱ्यांशी व भावंडांशी सौहार्द वाढेल. दूरवर राहणाऱ्या व्यक्तींचा संपर्क वाढल्याने आपणास हायसे वाटेल. दूरवर राहणारे मित्र किंवा स्नेहींचे आगमन झाल्याने आपण आनंदित व्हाल. आठवडयाच्या दुसऱ्या दिवसा पासून आपण व्यावसायिक आघाडी बाबत अधिक गंभीर व्हाल व आपल्या कारकीर्दीस योग्य दिशा देण्यासाठी सक्रिय व्हाल... आणखी वाचा

मीन 

आठवडयाच्या सुरुवातीस समाधानी वृत्ती आपल्यासाठी लाभदायी ठरेल. प्रथम दिवशी आपण संबंधांपासून विन्मुख राहाल. कदाचित एकांतवास आपल्यासाठी अधिक लाभदायी ठरू शकेल, असे ग्रह गोचर दर्शवित आहे. अशा वेळी भावना बाजूस ठेवून प्रत्येक बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोन बाळगावा. कुटुंबियांशी मतभेद उदभवतील. मातेच्या आरोग्याची चिंता उदभवेल. मानसिक उद्विग्नता वाढेल... आणखी वाचा

 

Web Title: weekly horoscopes 24 march to 30 march 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.