weekly horoscopes 19 may 2019 to 25 may 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 19 मे ते 25 मे 2019
आठवड्याचे राशीभविष्य - 19 मे ते 25 मे 2019

मेष

 

आठवड्याच्या सुरुवातीस आपले लक्ष शैक्षणिक प्रवृतींकडे अधिक प्रमाणात लागेल. आपले व्यक्तिमत्व उंचावण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होताना दिसून येईल. आपण नवीन साधने व तंत्रज्ञान ह्यांच्या उपयोगाने उत्तम कामगिरी करू शकाल. व्यापारात आपला फायदा होईल. आपण आपल्या भागीदाराच्या मदतीने बरेच काही उत्तम करून दाखवू शकाल. ह्या आठवड्यात आर्थिक लाभ होईल... आणखी वाच

वृषभ

आठवड्याच्या सुरुवातीस आपले व्यवस्थापन उत्तम राहील. आपण निश्चयीपणाने आपली नेमून दिलेली कामगिरी पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल. नोकरीत आपणास फायदा होईल, मात्र आठवड्याच्या अखेरीस कष्टाच्या मानाने परिणामात कमतरता असल्याचे जाणवेल. व्यापार वृद्धीसाठी आपण प्रयत्न करू शकाल. विद्यार्थ्यांना एकाग्रचित्त होण्यात अडचणी येतील. ह्या आठवड्यात आध्यात्मिक साधना जरूर करावी. त्याने आपणास खूपच मदत होईल... आणखी वाचा

मिथुन 

आठवड्याची सुरुवात चांगली होईल. व्यापार - व्यवसाय वृद्धीसाठी आपण करत असलेले प्रयत्न ह्या आठवड्यात सार्थकी लागतील. नोकरीत सुद्धा वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आठवड्याच्या अखेर पर्यंत आपणास देण्यात आलेली उद्दिष्टे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. ह्या आठवड्यात आपण नवीन कपडे, दागिने किंवा सौंदर्य प्रसाधनांची साधने खरेदी करू शकाल. मन आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. त्याचा उपयोग आपला अभ्यास व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करावा... आणखी वाचा

कर्क

आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी लाभदायी आहे. व्यापारी वर्गास व्यापार वृद्धीची संधी मिळेल. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी आपले नुकसान होऊ शकणार नाही. या आठवड्यात इतरांच्या कामात आपण अधिक व्यस्त राहाल. सरकारी योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्याचे नियोजन आपण करू शकाल. ह्या आठवड्यात केलेल्या कामांची फले आगामी कालखंडात उत्तमच मिळतील. विदयार्थ्यांनी परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन करावे... आणखी वाचा

सिंह

आठवडा मिश्र फलदायी आहे. मात्र, नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे. आपणास मात्र कार्यालयातील लोकांशी सलोखा राखावा लागेल. व्यापारी वर्गास बाहेरगावी जावे लागेल. नवीन कामाची सुरवात करण्यासाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात शुभ व व्यावहारिक प्रसंगात सुद्धा आपणास सहभागी व्हावे लागेल. आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. या आठवड्यात पैसा खूप खर्च होईल. विद्यार्थी संशोधन कार्यात स्वारस्य दाखवतील... आणखी वाचा

कन्या 

आठवडा चांगल्या व वाईट गोष्टीने भरलेला आहे. नोकरीत नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे, मात्र खर्चामुळे आपण त्रासून जाल. एखाद्या अनावश्यक कामावर सुद्धा खर्च होऊ शकतो. एखादा जुना संपत्ती विषयक वाद पुन्हा आपणास त्रास देऊ लागेल. व्यापारात विदेशातून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. त्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त होऊ शकेल. तांत्रिक विषयांच्या अभ्यासात मन लागेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल... आणखी वाचा

तूळ

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी असला तरीही आठवड्याची सुरुवात चांगली होईल. नोकरी व व्यापारातून चांगली प्राप्ती होऊ शकेल. वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न होतील. परंतु, मित्रांसह अनावश्यक खर्च होण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्या आठवड्यात खर्च वाढला तरी आवश्यक प्राप्ती होणार असल्याने काळजी करण्याचे काही कारण नाही. हा आठवडा विद्यार्थ्यांना मात्र पूर्णपणे अनुकूल नाही. अपार कष्ट करून सुद्धा त्यांना त्याचे अपेक्षित फळ मिळू शकणार नाही... आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्याची सुरवात चांगली होईल. व्यापारात भागीदारापासून लाभ होऊ शकतो. नोकरीत आपल्या कामात बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत असली तरी ह्या आठवड्यात कोणत्याही नवीन कामाची सुरवात करू नये. ह्या आठवड्यात कोणाला उसने पैसे दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता धूसर असल्याने उसने पैसे कोणास देऊ नये. खर्च करण्यात मात्र कंजुषी करू नका. सरकारी कार्यात मात्र सावध राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे... आणखी वाचा

धनु

आठवडा आपल्यासाठी मध्यम प्रतीचा आहे. व्यापारात भागीदारीशी संबंधित कामात सावध राहावे लागेल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा पूर्ण अभ्यास करणे हितावह राहील. कामाचा प्रवाह चांगला नसल्याने आपल्या खर्चांवर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा त्रास सहन करावा लागेल. आपणास व्यापारा संबंधी काळजी वाटत राहील. मात्र, नोकरीत असणाऱ्यांना आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात एखाद्या दुसऱ्या प्रकल्पाचे काम मिळू शकेल... आणखी वाचा

मकर 

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी चांगलीच होईल. नोकरीत व व्यापारात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आठवड्याच्या मध्यास काहीशी निराशा होण्याची शक्यता आहे. आपले कोणतेही काम होत नाही असे आपणास वाटत राहील. मनात काही शंका राहतील. ह्या दरम्यान व्यावसायिक बैठक किंवा प्रवास टाळणे हितावह राहील. व्यापारात लक्ष लागणार नाही. नोकरीत सुद्धा कामाच्या ठिकाणी प्रतिकूलतेचा अनुभव येईल. परंतु, आठवड्याच्या अखेरीस नशिबाची साथ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत... आणखी वाचा

कुंभ

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी चांगली नसली तरी आठवड्याच्या अखेरीस आपण एखाद्या नवीन कामाची सुरवात करू शकाल. ह्या आठवड्यात पैसे खर्च होण्याच्या शक्यतेमुळे घाई गडबडीत कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. सर्व कामे सावकाशच होत असल्याने झटपट श्रीमंत होण्याच्या मागे लागू नका. आपण मन लावून काम केल्यास आपणास आपल्या परिश्रमाचे उत्तम परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल... आणखी वाचा

मीन

आठवड्याची सुरुवात सामान्यच राहणार असल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. व्यापारात काही नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामावर नाराज होण्याची शक्यता आहे. विरोधक सुद्धा आपणास खाली मान घालावयास लावतील. मात्र, नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याचे दुसरे पर्व उत्तम राहील. घरातील वयोवृद्धांपासून सुद्धा लाभ होईल. मात्र, या आठवड्यात प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी कमी होईल, मात्र नंतर त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ लागेल... आणखी वाचा

 


Web Title: weekly horoscopes 19 may 2019 to 25 may 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.