शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

साप्ताहिक राशीभविष्य : २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२, यशदायक काळ, अचानक फायदे होतील, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 08:48 IST

Weekly horoscope for February 27 to March 5, 2022 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची रास

मेष - यशदायक काळ - हा सप्ताह तुम्हाला सर्वप्रकारचे यश देणारा ठरेल. नोकरीत उत्तुंग झेप घेता येईल.त्या दृष्टीने प्रयत्न केला तर निश्चितपणे यश मिळेल.सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपला नावलौकिक वाढेल. तुमचे महत्त्व वाढेल. सहकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. काही कामे रखडलेली असतील तर त्या कामांना गती मिळेल. आर्थिक आवक मनारसारखी राहील. काहींना प्रवास करावा लागेल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल.टीप -रविवार मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस. 

 वृषभ - चांगले अनुभव येतील, या सप्ताहात आपणास अनेक सकारात्मक अनुभव येतील.आपण ज्यांच्याकडून अपेक्षा केली नव्हती असे लोक पण सहकार्य करण्यासाठी पुढे येतील. अचानक धनलाभ होईल.लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जीवनसाथी चांगली साथ देईल. व्यवसायात भरभराटीचे दिवस येतील. तुमच्या शब्दाला मान राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. मानसन्मान मिळेल. भाग्याचे पाठबळ मिळेल. भेटवस्तू मिळतील. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस

 मिथुन - अचानक फायदे होतील. अकल्पित लाभ होतील. आपण विचार पण केला नव्हता अशा प्रकारचे फायदे होतील. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अचानक धनलाभ होईल. मात्र फार बेफिकीर राहू नका.वाहने जपून चालवा, प्रवास कार्यसाधक होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना अचानक बदलीला सामोरे जावे लागेल. घरी पाहुणे येतील.बचतीचे नियोजन केले पाहिजे. त्या दृष्टीने चांगल्या संधी चालून येतील. आपले अंदाज बरोबर ठरतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस 

कर्क - सर्वांचे सहकार्य मिळेल. जनसंपर्क चांगला राहील. विविध प्रकारचे लाभ होतील.लोक तुम्हाला सहकार्य करण्यासाठी पुढे येतील. घरातील सदस्यांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तुमच्या आवडी निव़डींचा विचार करेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल सुरू राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. खर्चाचे नियोजन नीट करणे आवश्यक आहे. आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं अशा पद्धतीने खर्च करू नका. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.   सिंह - विविध लाभ होतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. नशिबाची साथ मिळेल. पती-पत्नी परस्पर समन्वयाने वागतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक बाजू बळकट होईल. बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार जाणकारांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या .तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. वेळेचे नियोजन नीट करणे आवश्यक आहे. आळस झटकून कामे करा. टीप -रविवार,मंगळवार,बुधवार गुरुवार चांगले दिवस   कन्या - अचानक फायदे होतील. यशदायक काळ आहे. प्रवासाचे योग येतील. काही अचानक फायदे होतील. मानमरातब प्राप्त होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. मुलांचे कौतुक होईल. आपण स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. एखाद्या समारंभाला हजेरी लावाल. भेटीगाठी होतील. आपल्या व्यक्तिमत्त्वाच उजाळा मिळेल. नोकरतील मोठ्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार होईल. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार शनिवार चांगले दिवस. 

तूळ मन प्रसन्न राहील. घरात समारंभाचे आयोजन केले जाऊ शकते. काही घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. नातेवाईक,स्नेहीजन यांच्या भेटी होतील. खाण्यापिण्याची लयलूट राहील. मनात प्रसन्न विचार राहतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक मार्गांनी पैसे मिळतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. अनपेक्षितपणे मोठी संधी चालून येईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. आरोग्याची काळजी घ्या. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस  

वृश्चिक - कामे मार्गी लागतील. व्यवसायात बरकत राहील. आर्थिक आवक चांगली राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. मोठ्या उलाढाली होतील. फायद्याचे सौदे ठरतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचे प्रवास करावे लागतील. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. मनासारखे भोजन मिळेल. ओळखीतून कामे होतील. चांगल्या संधी चालून येतील. तुमच्या शब्दाला मान राहील. तुमचे महत्त्व वाढेल. अनुकूल ग्रहमानाचा फायदा घेण्यासाठी योजना आखा.वेळ वाया घालवू नका. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. 

धनू - ग्रहमान अनुकूल राहील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. नफ्याचे प्रमाण वाढेल. मोठे व्यवहार फायदा देणारे ठरतील. नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल. घर मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. घरी पाहुणे येतील. प्रवासात दगदग होईल. थोडे सतर्क राहा. हितचिंतकांचा सल्ला उपयुक्त ठरेल. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस 

मकर - कामात यश मिळेल. व्यवसायात तेजी राहील. माल हातोहात खपेल. व्यवसायात थोडे व्यस्त राहावे लागेल. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढा. एखादी मोठी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. थोरामोठ्यांच्या सहवासात याल. त्यातून फायदा होईल. भावंडांच्या भेटी होतील. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. कामातून सवड काढून आवडत्या छंदासाठी वेळ काढला पाहिजे. घरातील सदस्यांशी संवाद साधा. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस. 

कुंभ - चांगला काळ, जीवनसाथीशी सूर जुळतील. नात्यात गोडवा राहील. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. त्यांची प्रशंसा होईल. खर्चाचे नियोजन करा. अवांतर खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या पूर्वार्धात महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. उत्तरार्धात कामे मार्गी लागतील. धनलाभ होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. हातून दानधर्म घडेल. त्यामुळे मन:शांती मिळेल. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

मीन - धनलक्ष्मीची कृपा राहील. जे जे  ठरवाल ते ते पूर्ण होईल. अशा प्रकारची ग्रहस्थिती आहे. व्यवसायात भरभराट होईल. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी थोडे प्रयत्न करा. अचानक धनलाभ होईल. आपले अंदाज बरोबर ठरतील. योग्य निर्णय घ्याल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. प्रवासात काळजी घ्या. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य