शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आठवड्याचे राशीभविष्य - 7 जुलै ते 13 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 11:07 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

हा आठवडा आपल्यासाठी लाभदायी आहे. आपणास नोकरीत लाभ होतील. वरिष्ठ आपल्यावर खूश होतील. व्यापारी वर्गास विदेशातून लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यावसायिक प्रवास सुखद होतील. शेअर्स बाजार व दलाली कामातून सुद्धा लाभ होतील. मात्र, भागीदारीत नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्यात पगारवाढ किंवा प्रकल्पात बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे. आठवड्यात विदेशात जाण्याचा प्रयत्न आपण करू शकाल... आणखी वाचा

वृषभ

आठवड्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध हा आपणास जास्त अनुकूल आहे. आठवड्यात आपण भावी योजनांकडे विशेष लक्ष द्याल. कार्यस्थळी सुद्धा आपल्याकडे महत्वाची कामे येतील. मात्र,आठवड्यात ध्येयपूर्तीसाठी आपण आवश्यक कष्ट घेऊ शकणार नाहीत. नियोजन न करता केलेल्या कामाचे मध्यमच फळ आपणास मिळेल. त्यामुळे नियोजनबद्ध काम करणे योग्य ठरेल. आठवड्यात स्वतःच्या समस्या सोडविण्यासाठी आपणास मित्रांची व कुटुंबीयांची मदत घ्यावी लागेल... आणखी वाचा

मिथुन

आठवडा अपेक्षेनुसार आपल्यासाठी चांगला जाणारा आहे. नोकरी किंवा व्यावसायिक बैठकीसाठी एखादा प्रवास होऊ शकतो. कार्यालयात एखादा दुसरा प्रकल्प मिळू शकतो. नोकरीत पदोन्नती झाल्याने आपण आनंदित व्हाल. वरिष्ठ आपल्या कार्यावर खुश होतील. व्यापारात भागीदारीमुळे आपला फायदा होईल. वडिलांकडून सुद्धा आपला काही लाभ होऊ शकतो. ह्या आठवड्यात जमीन व संपत्ती विषयक कामे सहजपणे पूर्ण होतील... आणखी वाचा

कर्क

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याचे दुसरे पर्व अपेक्षेनुसार चांगले असेल. नोकरी किंवा व्यवसाया निमित्त बाहेरगांवी जावे लागू शकते. बैठकीतून काही फायदा होऊ शकेल. आठवड्यात दलाली किंवा कमिशन ह्यातून आर्थिक लाभ होणे अपेक्षित आहे. विमा एजन्ट, व्याज, रिकव्हरी इत्यादी कामे करणाऱ्यांना लाभ होऊ शकेल. आपण व्यापारवृद्धीचा विचार करू शकाल. ह्या आठवड्यात एखाद्या अचानक उदभवलेल्या खर्चामुळे आपणास त्रास होऊ शकतो... आणखी वाचा

सिंह

आठवड्यात सर्व कामे विचारपूर्वकच करावीत. कार्यालयात व व्यव्यसायात विरोधकांचा जोर वाढेल. मात्र, आपण त्यांचा सहजपणे पराभव करू शकाल. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्याने वातावरण आपणास अनुकूल होईल. सरकार किंवा भागीदारांशी आपले संबंध सौहार्दाचे रहातील. एखाद्या छोट्या प्रवासास किंवा व्यापारी बैठकीस आपण जाऊ शकाल. आठवड्यात घरासाठी एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी आपण करू शकाल. पूर्वी घेतलेले शेअर्स चांगल्या किंमतीत विकू शकाल... आणखी वाचा

कन्या

आठवड्यात व्यावसायिक बाबीत आपणास अधिक गंभीर व्हावे लागेल. व्यापार - व्यवसायात अंतर्गत मतभेदांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकतील. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात व्यावसायिक बाबीत अनुकूलता लाभेल. कार्यालयात व व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आठवड्यात एखाद्या आजारपणासाठी पैसे खर्च होतील. प्रवासासाठी सुद्धा खर्च होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

तूळ

आठवडा आपल्यासाठी बऱ्याच अंशी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण पूर्णपणे आध्यात्माकडे वळण्याची शक्यता आहे. आपण सत्संग, भजन इत्यादीत सहभागी व्हाल. एखाद्या धार्मिक ग्रंथाचे अध्ययन सुद्धा सुरु करू शकाल. जनसेवा करण्याचा आनंद आपण घेऊ शकाल. जमीन - जुमल्या संबंधित कामात सुद्धा आपण यशस्वी व्हाल. एखाद्या चांगल्या प्रकल्पात दीर्घ कालीन गुंतवणूक करू शकाल. विरोधकांवर आपण मात करू शकाल... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपल्यात निर्णयशक्तीचा अभाव असल्याचे दिसून येईल. एखाद्या महत्वाच्या विषयावरील चर्चेत आपला कमजोरपणा दिसून येईल. अतिरिक्त धांवपळीमूळे आपणास थकवा जाणवेल. एखाद्या अन्य ठिकाणांहून प्राप्ती होऊ शकते. विचारात दृढता येण्यासाठी आपणास नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्रासदायी ठरणारा आहे. त्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही... आणखी वाचा

धनु

आठवडा एकंदरीत आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्यात आपण प्राप्तीत वाढ करण्याचा विशेष प्रयत्न कराल. शेअर्स, सट्ट्याकडे आपले लक्ष लागेल. व्यावसायिक कामात सरकारी हस्तक्षेपामुळे आपल्या कार्यात विलंब होऊ लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात कार्यालयात व व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आठवड्याच्या मध्यास यशाचे प्रमाण कमी होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे... आणखी वाचा

मकर 

आठवडा आपल्यासाठी खूपच अनुकूल परिणाम मिळवून देणारा आहे. नोकरीत वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. पदोन्नतीची शक्यता आहे. नीर - निराळ्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नात आपणास फायदा होईल. नोकरी - व्यवसायात सुद्धा लाभ होतील. आपण केलेल्या कामातून अपेक्षित लाभ आपण मिळवू शकाल. संपत्तीच्या कामातून सुद्धा आपणास लाभ होईल. मात्र, व्यापारी कामात सरकारी क्षेत्राकडून अडथळा निर्माण होऊ शकतो... आणखी वाचा

कुंभ

आठवडा आपल्यासाठी चांगला नसला तरी सामान्यच आहे. आठवड्यात आपण नवीन प्रकल्प करण्यात व्यस्त राहाल. नवीन उद्दीष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. एखादी नवीन ओळख सार्थकी लागेल. दरम्यान हळू हळू आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्या अंतरात्माचा आवाज ऐकून काम केल्यास उद्दिष्ट गाठण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात आपल्या कष्टाच्या जोरावर आपण पद, प्रतिष्ठा व पैसा प्राप्त करू शकाल. दृढ निश्चय करून पुढे जावे लागेल... आणखी वाचा

मीन 

आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला राहील. आर्थिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आठवड्यात काही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेत सुधारणा होईल. आपण पुढे जाण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आठवड्यात आपण तणावमुक्त राहू शकाल. चिंता दूर सारून कामे कराल. ध्येय समोर ठेवून कामे करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपल्यातील सद्गुणांमुळे अनेक प्रलंबित कामे आठवड्यात आपण पूर्ण करू शकाल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष