शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

साप्ताहिक राशीभविष्य, २० ते २६ फेब्रुवारी २०२२, लाभदायक ग्रहमान, विविध मार्गांनी धनलाभ होईल, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 08:27 IST

Weekly Horoscope, 20 to 26 February 2022: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची रास

मेष - संमिश्र ग्रहमान: सप्ताहाची सुरुवात थोडी चाचपडत आणि अडचणींना तोंड देत होणार आहे. मात्र पूर्वार्धात संयम सोडू नका. सप्ताहाच्या शेवटी चांगली फळे प्राप्त होतील. या आठवड्यात आपण वाहन जपून चालवणे आवश्यक आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मन प्रसन्न राहील. यासाठी जे जे करता येईल ते करावे. मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहाल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी घ्याल. तर निश्चितपणे नवी उर्जा प्राप्त होईल. जीवनसाथी साथ देईल. अचानक धनलाभ होईल. मोठी संधी मिळेल. टीप - सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस

वृषभ  - सत्त्व परीक्षेचा काळ: या सप्ताहात प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला चालून येतील. मात्र, प्रगतीच्या सोबतच लोकांच्या मत्सरालाही तोंड द्यावे लागेल. काही अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जीवनसाथीशी किरकोळ कारणावरून मतभेद होतील. अचानक चालत्या गाडीला खीळ बसल्यासारखे भासेल. एकंदरीत सत्त्वपरीक्षा पाहिली जाईल, पण संयम आणि मुत्सद्दीपणा या जोरावर आपण बाजी माराल. त्यामुळे केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. टीप - रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस 

मिथुन -  ग्रहमान अनुकूल राहील: बऱ्याच दिवसांनंतर मनासारखे यश मिळेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. थोडी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. घरी पाहुणे येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रसिद्धी, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. भागीदारांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.  

 कर्क - पूर्वार्ध अनुकूल: सप्ताहाच्या सुरुवातीला चांगले यश मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी संवाद साधता येईल. जवळचे प्रवास होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कांहीनां कामानिमित्त फिरावे लागेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्या.खर्चावर नियंत्रण ठेवा कुणी तुमचा गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस. 

सिंह - उत्तम कालखंड : ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. भावंडांच्या भेटी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत बदल होईल. घरी लोकांची ये-जा राहील. मनासारखे भोजन मिळेल. मुलांना योग्य संघी मिळतील. त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळेल. त्यांचे सर्वत्र कौतुक होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस

कन्या - घरात मंगलकार्य ठरेल: अतिशय उत्साहवर्धक वातावरण राहील. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. नातेवाईक, स्नेहीजन यांचे आगमन होईल. घरात लगबग सुरू राहील. मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनींचे व्यवहार मार्गी लागतील. त्यात आपल्याला फायदा होईल. व्यवसायात मोठ्या उलाढाली जपून करा.नोकरीत अनुकूल स्थिती राहील. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. त्यात तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. जोडीदार चांगली साथ देईल. प्रवासात काळजी घ्या. टीप - रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस.  

तूळ - व्यवसायात भरभराट: या सप्ताहात व्यवसायाकडे जास्त लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. मालाची विक्री चांगली होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. सुरुवातीला खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काही पैसे अडकून पडतील. मात्र, कुणी तुमचा गैरफायदा घेणार नाही. याची काळजी घ्या. जीवनसाथीचे सांगले सहकार्य मिळेल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून सही करा. प्रवास कार्यसाधक ठरतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नेत्रविकारांचा त्रास होण्याची शक्यता आहे. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस   

वृश्चिक - धनलाभ होईल: या सप्ताहात ग्रहमान अनुकूल राहील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. धनलाभाच्या अनेक संधी चालून येतील. भेटवस्तू मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखी वास्तू खरेदी करण्याच्या योजना फलद्रृप होतील. घरी नातेवाईक, मित्रमंडळी येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. नोकरीत प्रगती होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. टीप - रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.   

धनू - विविध प्रकारचे लाभ होतील: या आठवड्यात आपल्याला अनेकांचे सहकार्य मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत बदली होई शकते. भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र खर्चाचे प्रमाण वाढते राहील. उत्तरार्धात प्रवासात दगदग होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मात्र कुणी तुम्हाला मोहात पाडून अडचणीत आणणार नाही ना याची दक्षता घ्या. जीवनसाथीशी सूर जुळतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. एक पाऊल आपण पुढे टाकायला हवे. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस  

मकर - भाग्य साथ देईल :या सप्ताहात उत्साही वातावरण राहील. भाग्याचे पाठबळ मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत प्रगती होईल. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. बदलीची शक्यता आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. जमिनीचे व्यवहार जपून करा. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.  

कुंभ - विविध लाभ होतील: लाभदायक असे ग्रहमान आहे. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. भेटवस्तू मिळतील. अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. अनेकांचे सहकार्य मिळेल. महिलांना दागिने, उंची वस्त्रे, वस्तू खरेदी करण्याची हौस पूर्ण करता येईल. नोकरीत थोडा तणाव राहील. काहींना मनाविरुद्ध बदलीला सामोरे जावे लागेल. तणावाच्या परिस्थितीत संयम सोडू नका. जीवनसाथीची चांगली साथ राहील. आत्मविश्वास दुणावेल. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस 

मीन -  दगदग टाळा: साधक-बाधक परिस्थिती राहील. काही लाभ होतील. मात्र खूप दगदग होईल, अशी कामे करू नका. जीवनसाथीच्या मर्जीनुसार वागणे इष्ट राहील. वाहने जपून चालवा. प्रवासात काळजी घ्या. नियोजन करून प्रवास करावा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. सहकारी मदत करतील. बढती मिळेल. पगारवाढ होईल. तुमचे महत्त्व वाढेल. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कानावर पडतील. टीप - रविवार, शुक्रवार,शनिवार चांगले दिवस 

 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष