शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० मार्च ते २६ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगती, धनलाभ अन् भरभराटीचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 08:01 IST

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी...

मेष: संमिश्र ग्रहमान

या सप्ताहात संमिश्र ग्रहमान अनुभवायला मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग, धावपळ होईल अशी कामे करू नका. जीवनसाथीशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा. उत्तरार्धात भाग्याची साथ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवासाचे योग येतील. काहींना नवीन घराच्या सजावटीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मनात सकारात्मक विचार राहतील, असा प्रयत्न करा. टीप - सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृषभ: मुलांना यश मिळेल

विविध आघाड्यांवर साधकबाधक परिणाम दिसून येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घ्या. दगदग टाळा. काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. त्यामुळे घरच्या लोकांकडून शाबासकी मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. योग्य ठिकाणीच शब्द टाकला पाहिजे. टीप - रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

मिथुन: अंदाज चुकू शकतात

मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या. एखाद्या आर्थिक व्यवहारात फसगत होण्याची शक्यता आहे. अंदाज चुकू शकतो. थोडे सावध राहा. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. तुमचे महत्त्व वाढेल. कामात उत्साह राहील. जीवनसाथीशी मधुन संबंध राहतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. घरी पाहुणे येतील. एखादी नवीन संधी चालून येईल. झेपेल एवढेच काम स्वीकारले पाहिजे. टीप - रविवार, शुक्रवार, शनिवार, गुरुवार चांगले दिवस.

कर्क: नवीन नोकरी मिळेल

लाभदायक ग्रहमान राहील. जे नवीन नोकरीच्या शोधात असतील, त्यांना योग्य संधी मिळेल. जर आपण नवीन घर खरेदी करू इच्छित असाल तर मनासारखी वास्तू मिळेल. तसेच एखादी मालमत्ता विक्री करायची असेल तर योग्य ग्राहक मिळेल. व्यवहार जुळून येतील. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. त्यात आपल्याला खूप व्यस्त राहावे लागेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या मदतीला जावे लागेल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मुले अभ्यासात प्रगती करतील. टीप - रविवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

सिंह: घरी पाहुणे येतील

धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जुनी येणी वसुल होतील. नवीन वास्तू खरेदी करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरी पाव्हण्यारावळ्यांचा आदळ राहील. भावंडांशी गैरसमज होतील. वादही होऊ शकतात. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. हलका आणि पचेल असाच आहार घ्या. आराम करणे आवश्यक आहे. वेळच्या वेळी तपासणी करून घेणे योग्य. कामाचा ताण घेऊ नका. टीप - रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

कन्या: प्रवास होतील

ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. पर्याटनाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. प्रवास कार्यसाधक ठरतील. मित्रांच्या संगतीत वेळ मजेत जाईल. मुलांच्या संगतीकडे नीट लक्ष द्या. घरी पाहुणे येतील. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन बदल फायद्याचे ठरतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे कराल. त्यामुळे आत्मविश्वास राहील. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ: भरभराट होईल

अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. आनंददायक अनुभव येतील. काहींना मौजमजा करण्यासाठी प्रवास करता येतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. मात्र, उत्पन्न पण वाढते राहील. त्यामुळे खर्च करण्यासाठी हात ढिला राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटी होतील. व्यवसायात भरभराट होईल. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. पण यश मिळाल्याने कामाचा ताण जाणवणार नाही. टीप - गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृश्चिक: धनलाभ होईल

आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. प्रवासात काळजी घ्या. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. महत्त्वाच्या कामात पूर्वार्धात थोड्या अडचणी येतील; पण संयम सोडू नका. कामांना नंतर गती मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मनासारखे भोजन मिळेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

धनु: नोकरीत प्रगती होईल

ग्रहमान अनुकूल राहील. तरीही जास्त आत्मविश्वास नको. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. ग्राहकांची वर्दळ राहील. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. नोकरीत प्रगती होईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या शब्दाला मान राहील. काही घरात मंगलकार्य ठरेल. टीप - रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मकर: विविध लाभ होतील

महत्त्वाच्या घटना घडतील. महत्त्वाचे निरोप येतील. व्यवसायात बरकत राहील. माल हातोहात खपेल. फायदे होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. काहींना प्रवास करावा लागेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. भाग्याचे पाठबळ मिळेल. नोकरीत थोडी दगदग होईल. एखाद्या सहकाऱ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. पण, थोडे संयमाने वागा. टीप - रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

कुंभ: नवीन संधी मिळेल

नोकरीत बदली होऊ शकते. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. प्रवासाचे योग येतील. प्रवासात काळजी घ्या. सतर्क राहा. काहींना नवीन नोकरी मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. काही नाहक खर्च होतील. जमिनीचे व्यवहार फायदे देणारे ठरतील. भेटवस्तू मिळतील. वाहने जपून चालवा. पूर्वार्धात संयमाने वागणे आवश्यक आहे. भावंडांशी गैरसमज होतील. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मीन: भाग्य साथ देईल

सप्ताहाच्या पूर्वार्धात महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, उत्तरार्धात आपल्या प्रगतीचा रथ वेगाने धावेल. भाग्याची साथ मिळेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. एखादी शर्यत जिंगाल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मानसन्मान मिळेल. काही कामे घरबसल्या होतील. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य