आजचे राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 07:21 AM2019-04-22T07:21:29+5:302019-04-22T07:21:55+5:30

कसा असेल तुमचा आजचा सोमवार, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 22 April 2019 | आजचे राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

आजचे राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

Next

मेष - आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा...

वृषभ - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. स्वकीय आणि जवळच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवाल. आणखी वाचा...

मिथुन - कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आणखी वाचा...

कर्क - शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा...

सिंह - आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा. आणखी वाचा...

कन्या - शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. आणखी वाचा...

तूळ - द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही. आणखी वाचा...

वृश्चिक - आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा...

धनु - उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. आणखी वाचा...

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा...

कुंभ - आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. आणखी वाचा... 

मीन - वरिष्ठ अधिकार्‍यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील. आणखी वाचा... 

 

Web Title: Today's zodiac sign - 22 April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.