Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 08:56 IST2019-11-29T08:55:35+5:302019-11-29T08:56:46+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019
आजचे पंचांग
शुक्रवार 29 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर 08 मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया 17 क. 40 मि.
मूळ नक्षत्र 07 क. 34 मि., धनु चंद्र
सूर्योदय 06 क. 55 मि., सूर्यास्त 05 क. 58 मि.
आज जन्मलेली मुलं-
धनु राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-मंगळ शुभयोगामुळे कार्यप्रांतात आपला प्रभाव निर्माण करतील. त्यात पदवी, अधिकार, प्राप्ती यांचा समावेश राहील. विचारातील सात्त्विकता प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. धनु राशी भ, ध आद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1869- समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म
1939- माधव ज्युलियम तथा माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं निधन
1950- सामाजिक कार्यकर्त्या आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे यांचं निधन
1959- रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचं निधन
1993- प्रसिद्ध उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांचं निधन
2011- साहित्यिक, कवयित्री, संपादिका इंदिरा गोस्वामी यांचं निधन