todays horoscopes 19 april 2019 | आजचे राशीभविष्य - 19 एप्रिल 2019
आजचे राशीभविष्य - 19 एप्रिल 2019

मेष 

 

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य वाढेल... आणखी वाचा

वृषभ

आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला आहे. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल... आणखी वाचा

मिथुन

आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल... आणखी वाचा

कर्क

अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला आहे. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यासमोर टिकून राहाल... आणखी वाचा

सिंह

आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मात्र सांभाळून राहण्याचा सल्ला आहे... आणखी वाचा

कन्या

आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील... आणखी वाचा

तूळ

संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला आहे. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. गैरसमज दूर करा... आणखी वाचा

वृश्चिक

जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. तेथे आपला वेळ आनंदात जाईल... आणखी वाचा

धनु 

आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप वरचे पद मिळेल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण असेल... आणखी वाचा

 मकर 

परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात पदोन्नती मिळेल... आणखी वाचा

कुंभ

नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी उग्र चर्चा अथवा मतभेद टाळू शकाल. दुपारनंतर प्रसन्नता वाढेल... आणखी वाचा 

मीन 

व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल... आणखी वाचा

 


Web Title: todays horoscopes 19 april 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.