आजचे राशीभविष्य - 13 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 07:33 IST2019-09-13T07:33:13+5:302019-09-13T07:33:30+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - September 13, 2019 | आजचे राशीभविष्य - 13 सप्टेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 13 सप्टेंबर 2019

मेष - श्रीगणेश सांगतात की आज मित्रांच्या संगतीमध्ये आनदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच तुम्हालाही त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

वृषभ - नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नवकार्यारंभ यशस्वीरीत्या कराल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. आणखी वाचा

मिथुन - कोणतेही नवे काम सुरू करायला दिवस अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. शरीरात थकवा आणि आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा

कर्क - प्रत्येक गोष्टीत आज जपून व्यवहार करा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करू नका. वाणी आणि संतापावर संयम राखा. आणखी वाचा

सिंह - वैवाहिक जीवनात आपापसांतील कुरबुरीमुळे पत्नी व पती यांच्यात तणाव वाढेल. साथीदाराची तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

कन्या - आज उत्साह आणि स्वास्थ्य अनुभवाल. घरात व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी जाईल. संततीची काळजी सतावेल. विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद-विवाद, बौद्धिक चर्चा यापासून दूर राहा. आणखी वाचा

वृश्चिक - आज शांतचित्ताने दिवस घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. चिंताग्रस्त मन आणि अस्वस्थ शरीर आपणाला ग्रासून टाकेल. आणखी वाचा

धनु - नवकार्यारंभास शुभ दिवस. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे बेत ठरवाल. तब्बेत चांगली राहील. भाग्योदय होईल. आणखी वाचा

मकर - आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. बोलण्यातील संयमच आपणाला संकटातून बाहेर काढेल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आनंदी राहाल. आणखी वाचा

मीन - अतिलोभ आणि हव्यास यात फसू नका असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आर्थिक विषयात खूप सावध राहा. आणखी वाचा
 

Web Title: Today's horoscope - September 13, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.