आजचे राशीभविष्य - 7 जून 2021; अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल अन् कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 06:56 AM2021-06-07T06:56:52+5:302021-06-07T06:57:23+5:30

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope - June 7, 2021; success will come only after hard work | आजचे राशीभविष्य - 7 जून 2021; अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल अन् कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल

आजचे राशीभविष्य - 7 जून 2021; अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल अन् कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल

Next

मेष - श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. कुटुंबीयांसमवेत आनंद आणि उत्साहात वेळ जाईल. आईकडून लाभ होण्याचे संकेत गणेशजींकडून दिले जात आहेत. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. आज घडणार्‍या घटनांमुळे आपण काळजीत पडाल. श्रीगणेशाच्या मते आपले स्वास्थ्य बिघडेल आणि डोळ्याचे विकार बळावतील. घरातील व्यक्तींचा विरोध आणि रुसवा याला तोंड द्यावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल व कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिच्या दृष्टिने योग्य दिवस. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबातही मुलगा, भाऊ व पत्नी यांच्याकडून लाभ होण्याचे संकेत आहेत. स्वादिष्ट भोजनाचे योग आहेत. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. संततीकडून आनंदी वार्ता समजतील.आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेशांना वाटते. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढतीचे योग. अधिकार्‍याबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियाबरोबर मनमोकळ्या गाप्पा. गृहसजावटीकडे लक्ष जाईल. कामासाठी बाहेर जावे लागेल. आणखी वाचा

सिंह -मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. व्यवहार न्यायपूर्ण असेल. आज धार्मिक तसेच मंगल कार्यात तुम्ही मग्न रहाल असे श्रीगणेश पाहताहेत. धार्मिक प्रवास घडतील. आज आपली वृत्ती रागीट असेल, म्हणून श्रीगणेश सावध करत आहेत. परदेशात राहणार्‍या नातलगांच्या बात- म्या समजतील. आणखी वाचा

कन्या - नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. स्वभाव रागीट बनेल म्हणून बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी चर्चेतून मतभेद होणार नाहीत, याची काळजी ध्या. पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्च वाढतील. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. प्रियकरासोबत प्रेमालाप होईल. मित्रासोबत प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वरमालंकारांची खरेदी होण्याचे योग आहेत. तन-मन तंदुरुस्त राहील. मान-सम्मान मिळेल.  आणखी वाचा

वृश्चिक - घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा. शत्रूवर मात होईल. उत्तम सहकार्य सहकार्यांकडून मिळेल. स्त्रीवर्गाशी ओळखी होतील. माहरहून बातम्या येतील, असे श्रीगणेश पाहताहेत. आणखी वाचा

धनु - आज प्रवास न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंतेने मन व्याकूळ होईल. कामे अपूर्ण राहिल्याने निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. कलासाहित्याकडे मनाचा कल राहून विविध कल्पना सुचतील. बौद्धिक चर्चेपासून दूरच राहा. आणखी वाचा

मकर -श्रीगणेश पाहताहेत की, आज आपली मनःस्थिती व आरोग्य काही चांगले असेल. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छातीसंबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. पाण्यापासून सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.  आणखी वाचा

कुंभ - आज आपणास मनाने हल्के हल्के वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांबरोबर काही आयोजन कराल. त्यांच्याबरोबर वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाल. विरोधकावर मात कराल.  आणखी वाचा

मीन - श्रीगणेश आज आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. रागावर व वाणीवर ताबा ठेवा नाहीतर मन दुःखी होईल. पैशाचे, देण्याघेण्याचे व्यवहार सावधतेने करा. मन व शरीराचे आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - June 7, 2021; success will come only after hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.