शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Horoscope : आजचं राशीभविष्य ९ फेब्रुवारी, २०२२, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील, जनसंपर्क वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 07:35 IST

Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष - जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे सांभाळून ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. जीवनसाथीशी किरकोळ वाद होतील. आहाराचे तंत्र सांभाळा. सकारात्मक विचार करा.  

वृषभ - जीवनसाथीची काळजी घ्या. क्रोधावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तणाव निर्माण होईल. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मात्र थोडी दगदग सहन करावी लागेल. नोकरीमध्ये साधक-बाधक स्थिती राहील.  मिथुन - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे तणावाचे वातावरण राहील. आपला हेका सोडणे आवश्यक आहे. क्रोधाला आवर घातला पाहिजे. जीवनसाथी चांगली साथ देईल. काही कारणाने गैरसमज होतील. एखादा अवचित लाभ होईल. समाजजीवनात समंजसपणे वागा.  

कर्क - आर्थिक आवक चांगली राहील. इतरांनी सल्ला दिल्यास तावून सुलाखून निर्णय घ्या. समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे ते लक्षात घ्या. त्यानुसार निर्णय घ्या. समाजसेवेत पुढाकार घ्याल. जवळच्या लोकांशी संवाद साधल्यामुळे मन मोकळे होईल.   

सिंह - नोकरीत बदल होतील. दगदग होईल. कामाचा ताण वाढेल. मित्र, सहकारी यांचे महत्त्व लक्षात येईल. महत्त्वाचे निरोप येतील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. त्यांचे सर्वत्र कौतुक होईल. तुमचा नावलौकिक वाढेल.  

कन्या - प्रवासाचे योग येतील मात्र थोडी काळजी घेतली पाहिजे. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्याचे तंत्र सांभाळा. नोकरीत संयमाने वागणे आवश्यक आहे. सहकारी वर्गाला सांभाळून घ्या.  

तूळ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात अडचणी येतील. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. अकल्पित लाभ होतील. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल.  

वृश्चिक - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. सोशल मीडियावर फार सक्रीय राहू नका. व्यवसायात नवीन संधी मिळेल. विचार करून निर्णय घ्या. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

धनू - नोकरीमध्ये लाभदायक काळ आहे. अधिकारीवर्गाचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने बोलणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाथीची साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील.  

मकर - भाग्याची चांगली साथ राहील. काहींना प्रवास करावा लागेल. नवीन ओळखी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. खर्चाचे प्रमाण नियंत्रणात ठेवा. नोकरीत वादापासून दूर राहा.  

कुंभ - विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली जाईल. कामात उत्साह राहील. घरी पाहुणे येतील. थोडी धावपळ करावी लागेल. नोकरीमध्ये दगदग होईल. कामात व्यस्त राहावे लागेल.  

मीन - नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. मित्र, सहकारी यांची भेट होईल. जनसंपर्क वाढेल. प्रवासात काळजी घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष