शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २४ फेब्रुवारी २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, बचतीचे नियोजन केले पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 07:23 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – थोरा-मोठ्यांच्या सहवासात याल. त्याची मदत मिळेल. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकलणे ठीक राहील. मालमत्तेच्या कामात कटकटी होतील. जोडीदाराचे सकारात्मक पाठबळ व सल्ला मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

वृषभ – नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. एखाद्या सहकाऱ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. मात्र मुत्सद्दीपणाने वागून आपण सफलता मिळवाल. फसव्या योजनांपासून सावध राहा. जोडीदाराचे मन दुखवू नका.

मिथुन – जीवनासाथीशी मधुर संबंध राहतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवणार नाही, याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो प्रवास टाळलेला बरा.

कर्क – मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. मुलांशी संवाद साधा. प्रवास शक्यतो टाळा. महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. इतरांच्या भानगडीत पडू नका. दुसऱ्यांना सल्ला देऊ नका.

सिंह – जुनी कामे निपटून काढण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे हलके वाटेल. सार्वजनिक कार्यात लोकांना दुखवू नका. संयमाने वागणे आवश्यक आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या नावलौकिकात भर पडेल. मानमरातब मिळेल.

कन्या – व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, नेहमीपेक्षा जास्त परिश्रम करावे लागतील. वेळात वेळ काढून थोडा आराम करणे आवश्यक आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नातेवाईक भेटतील. प्रवास शक्यतो टाळा. कायद्याची बंधने पाळा. वाहने जपून चालवा.

तूळ – व्यवसायात विक्री चांगली होईल. बरकत राहील. नातेवाईक, स्नेहीजन यांची भेट होईल. मालमत्तेच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून घेणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत कामात व्यस्त राहाल. कायद्याची बंधने पाळा.

वृश्चिक – धनलाभाच्या दृष्टीनं चांगला काळ आहे. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जुनी येणी वसूल होतील. जीवनसाथीला नाराज करु नका. एखाद्या छोटेखानी समारंभात हजेरी लावाल. नोकरीत अनुकूल घटना घडतील.

धनू – विवाहेच्छूंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली होतील. त्यादृष्टीने काळ अनुकूल आहे. महत्त्वाच्या कामात संयमाने वागणे आवश्यक आहे. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत प्रगती होईल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. मनात आत्मविश्वास राहील.

मकर – नोकरीत अनुकूल बदल होतील. कामाचे स्वरुप बदलेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. बचतीचे नियोजन केले पाहिजे. मनासारखे भोजन मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील.

कुंभ – धावपळीचा दिवस राहील. नातेवाइकांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. नोकरीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. एखाद्या कार्यक्रमात भाग घ्याल.

मीन – ग्रहमानाची साथ राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. कामे मार्गी लागतील. काही अचानक फायदे होतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. हितचिंतकांच्या भेटी होतील. मुलांशी संवाद साधा. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य