शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२२; लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 07:16 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – नोकरीत प्रगती होईल. सहकारी मदत करतील. त्यामुळे कामाचा ताण राहणार नाही. तुमचे म्हणणं सर्वांना पटेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. काहींना प्रवास करावा लागेल. पैशाचा ओघ सुरु राहील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. महत्त्वाचा निरोप येईल.

वृषभ – महत्त्वाची कामे शक्यता पुढे ढकलता आली तर बघा. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. फार धावपळ करु नका. फसव्या योजनांपासून चार हात दूर राहणेच योग्य. प्रवासात दगदग होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

मिथुन – व्यवसायात मोठी उलाढाल होईल. त्यात आपल्याला फायदा होईल. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. प्रेमात असाल तर घरी सांगणे योग्य ठरेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. सहजासहजी यश मिळेल. सार्वजनिक कार्यात संयम राखणे आवश्यक आहे.

कर्क – नोकरीत अनुकूल बदल होईल. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. कामाचा ताण राहील. तरुणांना मुलाखतीत यश मिळेल. घरी पाव्हण्या रावळ्यांचा राबता राहील. मुलांकडे दुर्लक्ष करु नका. महिलांना घरातील कामात वेळ द्यावा लागेल.

सिंह – नातेवाइकांच्या भेटी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. त्यांचे कौतुक होईल. जोडीदाराच्या कलाने घ्या. आरोग्याची तक्रारी दूर होईल. मनात आनंदी विचार राहतील. व्यवसायात विक्री चांगली राहील.

कन्या – अनुकूल ग्रहमान आहे. संधीचा फायदा घ्या. महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक आवक चांगली राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक व्यवहार करताना जाणकरांचा सल्ला घ्या. नोकरीत प्रगती होईल.

तूळ – महत्त्वाचे काम पूर्ण होईल. त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल. जवळच्या लोकांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मनावरचा ताण कमी होईल. मालमत्तेच्या कामात सावधानता बाळगा. व्यवसायात बरकत राहील.

वृश्चिक – प्रवासात सतर्क राहा. चीजवस्तूंची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. मनासारखे भोजन मिळेल. नातेवाइकांच्या भेटी होतील. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. मोठेपणा मिरवण्याच्या नादात पैसा उडवू नका.

धनू – ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. विविध प्रकारचा फायदा होईल. आर्थिक आवक मनासारखी राहील. बचत करता येईल. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल.

मकर – जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. खर्च करण्याकडे कल राहील. कुणी फार सलगी करत असेल तर सावध राहा. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. नोकरीत अनुकूल बदल होईल. मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. पुढाकार घ्याल.

कुंभ – नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. काही सोयीसुविधा वाढवून मिळतील. जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न कराल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. नशिबाची साथ मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे.

मीन – नोकरीत अनुकूल घटना घडतील. आर्थिक आवक राहील. महत्त्वाच्या बातम्या कानांवर पडतील. त्याचा भविष्यात उपयोग होईल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. कायद्याची बंधने पाळा. एखाद्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य