शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२२; भाग्याची चांगली साथ राहील, अचानक धनलाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 07:35 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – जीवनसाथी चांगली साथ देईल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. सोप्या रितीने यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक राहील.

वृषभ – आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल अशी कामे करु नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयम सोडू नका. अचानक धनलाभ होईल. कुणी अडचणीत आणणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. प्रवास शक्यतो टाळा

मिथुन – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. थोडे क्रोधाला आवर घालणे आवश्यक आहे. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल.

कर्क – नोकरीत बदलीची शक्यता आहे. काहींना नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी थोडी दगदग होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. त्यात थोडे व्यस्त राहाल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील.

सिंह – व्यवसायात भरभराट होईल. सतत कार्यरत राहाल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. योग्य संधी मिळेल. जोडीदाराच्या मर्जीनुसार वागणे इष्ट ठरेल. कामात उत्साह राहील. मन प्रसन्न राहील.

कन्या – धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.

तूळ – मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीच्या कलाने घ्या. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. नातेवाईक स्नेहीजन यांची भेट होईल. व्यवसायात भरभराट होईल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचूनच सही करा

वृश्चिक – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. तुमचे महत्त्व लोकांना पटेल. घरी पाहुणे येतील. नातेवाईकांच्या भेटी होतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काहींना दूरच्या प्रवासाचे योग येतील.

धनू – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. काहींना प्रवास करावा लागेल. भेटवस्तू मिळतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कामात उत्साह राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल.

मकर – नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. अचानक नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. चैनीवर खर्च करण्याकडे ओढा राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. मोहात पडून नुकसान करुन घेऊ नका

कुंभ – भाग्याची चांगली साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होतील. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. नोकरीत प्रगती होईल. भेटवस्तू मिळतील. मित्र-मैत्रिणीच्या सहवासात मजेत वेळ जाईल.

मीन – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील. योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल. आर्थिक लाभ होईल. घरातील सदस्यांशी वाद होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य