शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

आजचे राशीभविष्य - २५ फेब्रुवारी २०२२; चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 07:08 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – महत्त्वाची कामे मार्गी लागतील. दुपारच्या नंतर परिस्थिती अनुकूल होईल. अडचणी दूर होतील. प्रवासाचे योग येतील. प्रवास कार्य साधक ठरेल. अचानक धनलाभ होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील.

वृषभ – महत्त्वाची कामे सकाळीच आटोपून घ्या. प्रवास शक्यतो टाळा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. सावधपणे व्यवहार करणे योग्य ठरेल.

मिथुन – प्रेमात यश मिळेल. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. आरोग्य चांगले राहील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. जनसंपर्क वाढेल. आर्थिक आवक राहील.

कर्क – ग्रहमान सामान्य राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. शक्यतो काम पुढे ढकला. प्रवास टाळा. मुलांची काळजी घ्या. त्यांच्यावर ताण वाढणार नाही याची दक्षता घ्या. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत ठिकठाक स्थिती राहील.

सिंह – नोकरीतील अडचणी दूर होतील. भाग्याची चांगली साथ राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. कामाचा ताण कमी होईल. प्रसिद्धी, नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील.

कन्या – घरात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाईल. पाव्हणे रावळे, मित्र घरी येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. महिला वर्गाला घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. महत्त्वाचे बदल होतील. जोडीदाराची काळजी घ्या

तूळ – व्यवसायात बरकत राहील. विक्री चांगली होईल. नफ्याचे प्रमाण जास्त राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरेल. जमिनीचे व्यवहार सुरळीतपणे पार पडतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

वृश्चिक – महत्त्वाचे काम मार्गी लागेल. मनावरील ताण कमी होईल. अडचणी दूर होतील. अचानक धनलाभ होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळतील.

धनू – ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील.

मकर – खर्चाचे प्रमाण वाढते राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.

कुंभ – नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होईल. विविध मार्गांनी पैसे मिळतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल.

मीन – अचानक चांगली संधी मिळेल. नोकरीत महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. बदल फायद्याचे ठरतील. घरी पाहुणे येतील. लाभाचे प्रमाण वाढते राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य