शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२२, भाग्याची साथ राहील, महत्त्वाच्या कामात यश मिळेल, प्रेमात अपेक्षित साथ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:03 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

मेष - विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. फायदे होतील. जीवनसाथीकडून लाभ होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. अडणी दूर होतील. जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न कराल.

वृषभ - आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. नोकरीत चांगली स्थिती राहील. आर्थिक आवक राहील. पैशाचे व्यवहार जपून करा. उसने पैसे देताना विचार करून द्या.

मिथुन - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मानसन्मान मिळेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. उत्तम प्रवास होतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. त्यामुळे फायदे होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. वरिष्ठांची मदत मिळेल.

कर्क - घरी पाहुणे येतील. गडबड राहील. धावपळ करावी लागेल. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. तुमचे महत्त्व वाढेल. अचानक धनलाभ होईल. भाग्याचे पाठबळ मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घ्या.

सिंह -  भावंडांच्यांच्या भेटीगाठी होतील. नातेवाईकांच्या संपर्कात राहाल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमप्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाण घेवाण होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

कन्या - धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. गैरसमज करून घेऊ नका.

तूळ - जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. मात्र मुलांकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिलेल. आर्थिक आवक चांगली राहील.

वृश्चिक - महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. शक्यतो महत्वाची कामे पुढे ढकला. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सतर्क राहाल. जीवनसाथी चांगील साथ देईल. मुलांना चांगल्या संधी मिळतील. मात्र सबुरीचा सल्ला द्या.

धनू  - व्यवसायात बरकत राहील. मालाला उठाव राहील. हाती पैसा येईल. वसुलीसाठी तगादा लावावा लागेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासमवेत मजेत वेळ जाईल. अनावश्यक खर्च होईल. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. प्रसिद्धी मिळेल.

मकर - नोकरीत कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. नवीन संधी मिळेल. कामाचे स्वरूप बदलेल. अधिकार वाढवून मिळतील. तुमचे महत्त्व वाढेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मोठ्या सौद्यात मनासारखा फायदा होईल.

कुंभ - भाग्याची साथ राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. प्रेमात अपेक्षित साथ मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. स्वत:चे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करा.

मीन - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. विलासी जीवन जगता यावे या उद्देशाने खर्च होईल. कुणी तुम्हाला मोहात पाडू शकेल. त्या दृष्टीने सावधानता बाळगा. नको तिथे खर्च करू नका. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मुले प्रगती करतील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य