शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२२,  विविध प्रकारचे लाभ होतील, मानसन्मान मिळेल, तुमचे महत्त्व वाढेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 08:17 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

मेष -  दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मनस्ताप सहन करावा लागेल. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. उपासनेमुळे मनाला समाधान वाटेल.

वृषभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कामाचे योग्य नियोजन कराल. आर्थिक लाभ होईल. मुलांशी संवाद साधा त्यांना योग्य मार्गदर्शन करा. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. त्यातून उपयुक्त माहिती कळेल. ज्याचा फायदा होईल. जीवनसाथी साथ देईल.

मिथुन - विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. मानसन्मान मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवी नोकरी मिळेल. घरी पाहुणे येतील. सरकारी कामात यश मिळेल. जोडीदार चांगली साथ देईल.

कर्क - प्रवास घडून येतील. व्यवसायात सतत कार्यरत राहाल. गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. तुमचे महत्त्व सर्वांना पटेल. कामात उत्साह राहील. नोकरीत प्रगतीला पुरत वातावरण राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल.

सिंह - आर्थिक आवक मनासारखी राहील. एखाद्या सौद्यात मोठा फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत चांगली संधी मिळेल.

कन्या - अतिशय सकारात्मक परिस्थिती अनुभवण्यास मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. कामात लक्ष लागेल. मनावर ताण राहणार नाही. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. आर्थिक आवक चांगली राहील. भावंडांशी सख्य राहील.

तूळ - खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासाचे नीट नियोजन करा. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. जीवनसाथी चांगली साथ देईल.

वृश्चिक - महत्त्वाचे निरोप येतील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. काहींना जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील. मुले अभ्यासात प्रगती करतील. भाग्याची साथ राहील.

धनू  - सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. कामाची प्रशंसा होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत प्रगतीच्या दिशेना वाटचाल सुरू राहील. गृहसौख्य, मुलांचे यश, नातेसंबंध या दृष्टीने अनुकूल घटना घडतील. 

मकर -  धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. भेटवस्तू मिळतील. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. आध्यात्मिक प्रगती होईल. घरी पाहुणे मंडळी येतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. भाग्याचे पाठबळ मिळेल. चांगल्या घटना घडतील.

कुंभ -  महत्त्वाचे काम करताना अडथळे येतील. कामे पुढे ढकलणे योग्य राहील. कसेही करून काम करायचेच असा अट्टाहास करू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आराम करणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढेल, कायद्याची बंधने पाळा.

मीन -  महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत पूर्ण करा. कामासाठी खूप वेळ जाईल. आर्थिक उलाढाली फायदेशीर ठरतील. मनाच आनंदी विचार राहतील. महागड्या वस्तू खरेदी करण्यचा मोह आवरणार नाही. मनासारखे भोजन मिळेल.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य