आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 07:30 AM2020-08-06T07:30:36+5:302020-08-06T07:31:07+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 6 August 2020; Scorpio, Cancer risk of loss and differences | आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका

आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आज मित्रांच्या संगतीमध्ये आनदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच तुम्हालाही त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा.

वृषभ - नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नवकार्यारंभ यशस्वीरीत्या कराल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. आणखी वाचा.

मिथुन - कोणतेही नवे काम सुरू करायला दिवस अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. शरीरात थकवा आणि आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा.

कर्क - प्रत्येक गोष्टीत आज जपून व्यवहार करा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करू नका. आणखी वाचा.

सिंह - वैवाहिक जीवनात आपापसांतील कुरबुरीमुळे पत्नी व पती यांच्यात तणाव वाढेल. साथीदाराची तब्बेत बिघडेल. आणखी वाचा.

कन्या - आज उत्साह आणि स्वास्थ्य अनुभवाल. घरात व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा.

तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी जाईल. संततीची काळजी सतावेल. विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद-विवाद, बौद्धिक चर्चा यापासून दूर राहा. आणखी वाचा.

वृश्चिक - आज शांतचित्ताने दिवस घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. चिंताग्रस्त मन आणि अस्वस्थ शरीर आपणाला ग्रासून टाकेल. आणखी वाचा.

धनु - नवकार्यारंभास शुभ दिवस. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे बेत ठरवाल. तब्बेत चांगली राहील. भाग्योदय होईल. आणखी वाचा.

मकर - आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. बोलण्यातील संयमच आपणाला संकटातून बाहेर काढेल. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आनंदी राहाल. भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अनुभव चांगले येतील. आणखी वाचा.

मीन - अतिलोभ आणि हव्यास यात फसू नका असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आर्थिक विषयात खूप सावध राहा. आर्थिक गुंतवणूक शिक्का, सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. आणखी वाचा.
 

Web Title: Today's horoscope - 6 August 2020; Scorpio, Cancer risk of loss and differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.