आजचे राशीभविष्य- 05 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:56 AM2020-03-05T06:56:19+5:302020-03-05T06:56:43+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 5th March 2020 | आजचे राशीभविष्य- 05 मार्च 2020

आजचे राशीभविष्य- 05 मार्च 2020

Next

मेष - आजचा दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. आणखी वाचा

वृषभ - आज मन स्थिर ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कारण चंचल मनोदशेमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. आणखी वाचा

मिथुन - लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. स्वादिष्ट व रूचकर भोजन, वस्त्रालंकार तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया अत्यंत आनंदाचा दिवस. आणखी वाचा

कर्क - आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका अशी सूचना श्रीगणेश देतात. संबंधित व्यक्तींशी मतभेद होतील. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे सांगतात. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. आणखी वाचा

कन्या - शुभ फल प्राप्तीचा दिवस. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस फारच चांगला आहे. आणखी वाचा

तूळ - व्यावसायिक क्षेत्रात लाभांचे संभव श्रीगणेश वर्तवितात. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवा असा श्रीगणेशांचा तुम्हाला सल्ला आहे. नवीन कामात अपयश येण्याचे योग असल्याने नवीन कामे सुरू करू नका. आणखी वाचा

धनु -  श्रीगणेश म्हणात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. आणखी वाचा

मकर - व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभप्रद आहे असे श्रीगणेशांचे म्हणणे आहे. व्यवसायात तुम्ही ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आणखी वाचा

कुंभ - आपले विचार व बोलणे यात बदलाव येईल. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. ध्यान, लेखन व सृजनात्मकता यातून आनंद मिळेल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश म्हणतात की आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल. कुटुंबियांशी वादविवाद न करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

 

Web Title: Todays horoscope 5th March 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.