शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

आजचे राशीभविष्य - 3 जानेवारी 2022 - तूळसाठी आर्थिक लाभाचा अन् मकरसाठी खर्चाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 07:55 IST

Today's horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १३, १९४३. तिथी : पौष शुक्ल प्रतिपदा. (रात्री ८.३२ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४३, प्लव नाम सवस्तर, नक्षत्र : दुपारी १.३३ पर्यंत पूर्वाषाढा, त्यानंतर उत्तराषाढा. रास : सायंकाळी ६. ५२ पर्यंत धनू, त्यानंतर मकर. आज : चांगला दिवस. राहू काळ : सकाळी ७.३० ते ९ ( राहू काळात महत्त्वाची कामे टाळा). 

मेषविद्यार्थ्यांना यश मिळेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील.  नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात मनासारखे बदल होतील. तुमचे महत्त्व वाढेल. सहकाऱ्यांशी थोडे जुळवून घेण्याची गरज आहे. घरी पाहुणे येतील. 

वृषभमहत्त्वाचे काम संध्याकाळनंतर मार्गी लागेल.  प्रवासात दगदग होईल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र हितशत्रूपासून सावध राहा. क्रोधाला आवर घातला पाहिजे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मिथुनमहत्त्वाची कामे दिवसा उजेडी करून घ्या. प्रवास शक्यतो टाळलेले बरे. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील, तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. भागिदारी व्यवसायात यश मिळेल. मुलांना यश मिळेल. 

कर्कमहत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडा संयम ठेवा. सूर्यास्तानंतर कामे मार्गी लागतील. अडचणीतून मार्ग निघेल. कामाची धावपळ करत असताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराची चांगली साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील.

सिंहजवळचे प्रवास करावे लागलील. मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत पूर्ण करून घ्या. घरात थोडे तणावाचे वातावरण राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिक वाढेल. 

कन्याघरी पाहुणे येतील. पाहुण्यांची सरबराई करताना महिलांची धावपळ होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात उत्साह राहील. नवीन काम स्वीकारावे लागेल. जवळच्या प्रवासाचे योग आहेत, आर्थिक आवक चांगली राहील.

तूळआर्थिक लाभ होईल. विविध मार्गांनी धनप्रात्पी होईल. व्यवसायात भरभराट होील. मालाला चांगला उठाव होईल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. नातेवाईकांच्या भेटी होतील. खाण्या-पिण्याची लयलूट राहील. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.

वृश्चिकधनलाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. त्यात आपल्याला फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. जवळचे प्रवास होतील. व्यवसायात चढ-उतार चालू राहतील. 

धनुविवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. मनासारखे प्रस्ताव समोर येतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या भरभराट होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.  मनासारखे भोजन मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत लाभ होईल.

मकरमहत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, सायंकाळनंतर अडचणी दूर होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दूरचे प्रवास होतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील.

कुंभधनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. आवडत्या माणसांचा सहवास लाभेल. प्रेमात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. नोकरीत थोडा ताण राहील. महत्त्वाचे काम दिवसा उजेडी पूर्ण करा.

मीननोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रगती होईल, पगारवाढ व इतर आर्थिक फायदे होतील. ग्रहांचे पाठबळ मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. योग्य सल्ला मिळेल. घरी पाहुणे येतील.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष