राशीभविष्य- २३ फेब्रुवारी २०२१ : कर्कसाठी खर्चाचा अन् कन्येसाठी लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 06:52 AM2021-02-23T06:52:55+5:302021-02-23T07:07:56+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays Horoscope 23 February 2021 | राशीभविष्य- २३ फेब्रुवारी २०२१ : कर्कसाठी खर्चाचा अन् कन्येसाठी लाभाचा दिवस

राशीभविष्य- २३ फेब्रुवारी २०२१ : कर्कसाठी खर्चाचा अन् कन्येसाठी लाभाचा दिवस

Next

मेष - विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा  

वृषभ - आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला अडचणीत आणेल. महत्त्वाचा वेळ त्यासाठी खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव सोडा अन्यथा कोणाशी चर्चा, विवादा दरम्यान संघर्ष होईल. आणखी वाचा  

मिथुन - आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. घरात किंवा मित्र आणि कुटुंबीयांसमवेत बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आणखी वाचा  

कर्क - आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग येतील. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा  

सिंह - कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही असे श्रीगणेश सांगतात. मन विचारांत अडकून पडेल.  आणखी वाचा  

कन्या - सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी आणि नोकरदार यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कृपेमुळे बढतीचे योग संभवतात. आणखी वाचा  

तूळ - आज नोकरीच्या ठिकाणी आपणाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. धार्मिक यात्रेचे योग आहेत. आणखी वाचा  

वृश्चिक - रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामांपासून दूर राहा. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. आणखी वाचा  

धनु - आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. त्यांच्या सोबत हिंडणे- फिरणे वा मनोरंजक स्थळी जाण्याचा योग येईल. आणखी वाचा  

मकर - आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्‍यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. पैशाच्या देवाण- घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. आणखी वाचा  

कुंभ - आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाही. सातत्याने बदल होत राहील. स्त्रियांनी वाणीवर काबू ठेवा. शक्यतो यात्रा- प्रवास टाळा. आणखी वाचा  

मीन - आपणाला सूचना देतात की घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा 

Web Title: Todays Horoscope 23 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.