todays horoscope 16th October 2020 | राशीभविष्य - १६ ऑक्टोबर २०२०, 'या' राशीच्या व्यक्तींचा बराच पैसा खर्च होईल

राशीभविष्य - १६ ऑक्टोबर २०२०, 'या' राशीच्या व्यक्तींचा बराच पैसा खर्च होईल

मेष -  आज श्रीगणेशाचा आशीर्वाद लाभल्याने दिवसभर मानसिक दृष्ट्या समाधान वाटेल. कौटुंबिक जीवन सुखी राहील. त्याच बरोबर सुखमय प्रवास आणि रूचकर भोजन मिळण्याचा योग आहे. हरवलेली एखादी वस्तू सापडेल. तरीही आपले विचार आणि अतिउत्साहाला आवर घाला. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश आणि लाभ मिळेल. आणखी वाचा

वृषभ - आज दिवसभर मनात आनंदाची छटा उमटेल. कामात व्यवस्थितपणे आघाडीवर राहाल आणि योजनेनुसार कार्यपूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील. माहेरहून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

मिथुन - आजचा दिवस मध्यम राहील. नवे काम हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटेल. त्यामुळे मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने तब्बेत नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळा. आणखी वाचा 

कर्क - आज सांभाळून राहा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी आज कष्ट घ्यावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांमुळे त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने पण मन दुःखी होईल. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. आणखी वाचा 

सिंह - कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात यांमुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र आणि स्नेही यांच्या समवेत एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या- फिरण्याचा आनंद घ्याल. तब्बेतही एकदम चांगली राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस आपणासाठी शुभ राहील असे श्रीगणेश सांगतात. मधुर वाणी इतरांच्या मनावर सकारात्मक छाप पाडेल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आणखी वाचा 

तूळ – आज अनैतिक अव्यवहार समस्या निर्माण करू शकतात. दुर्घटनांपासून दूर राहा. सग्यासोयऱ्यांशी वाद होतील. मनोरंजन आणि प्रवासावर पैसे खर्च होतील. कामेच्छा प्रबळ राहील. शारीरिक, मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी अध्यात्मिक मार्ग सहाय्य करेल.

वृश्चिक -  श्रीगणेश म्हणतात की आज तुमचा हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्यासंबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. दुर्घटनेपासून जपा. कुटुंबीय किंवा सगे- सोयरे यांच्याशी गैरसमज होईल किंवा पटणार नाही. आणखी वाचा 

धनु - आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. श्रीगणेश कृपेने मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल. आवडत्या व्यक्तीबरोबर सुखद क्षण अनुभवाल. मित्रांबरोबर पर्यटन स्थळाला भेट द्याल.  आणखी वाचा 

मकर -  व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढतील. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास यातून फायदा संभवतो. वरिष्ठ तुमच्यावर खूश असल्याने पदोन्नतीचे योग आहेत. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. आणखी वाचा 

कुंभ - श्रीगणेश म्हणतात की शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठापासून संभाळून राहावे लागेल. मौज-मजा तसेच सहली यासाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. आणखी वाचा 

मीन -  श्रीगणेशांना आज तुमचा अचानक धन लाभाचा योग दिसतो आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. पाण्यापासून दूर राहा. इस्टेटीतून फायदा होईल. आणखी वाचा  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: todays horoscope 16th October 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.