शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 13 जानेवारी 2021; सिंहला प्रणयासाठी दिवस अनुकूल, मेषने वाद घालत बसू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 07:41 IST

Todays Horoscope 13 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - कोणत्याही प्रकारच्या संकटात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद घालत बसणे हिताचे नाही.  आणखी वाचा.वृषभ - आपला हळवेपणा आपणाला बेचैन करील असे श्रीगणेश सांगतात. शरीर स्वास्थ्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. आणखी वाचा.मिथुन - आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजनाच्या 'मूड' मध्ये राहाल. मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील.  आणखी वाचा.कर्क - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, असे श्रीगणेश सांगतात. माहेरहून आनंदाच्या वार्ता मिळतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.  आणखी वाचा.सिंह - प्रणयासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा.कन्या - श्रीगणेशांचे सांगणे आहे की आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी आणि चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर अपमान होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा.तूळ - नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मनात औदासिन्य पसरेल.. आणखी वाचा.वृश्चिक - ठरवलेले काम पूर्ण न झाल्याने निराशा येईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा अंतिम निर्णय घेऊ नये असा सल्ला श्रीगणेश देतात. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. आणखी वाचा.धनु - आजचा दिवस आपणासाठी शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. कामेपूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साही आणि ताजेतवाने राहाल.  आणखी वाचा.मकर - बोलणे आणि वागणे यामुळे भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. संतापाचे प्रमाण वाढेल. पण कोणाशी वाद वा मतभेद होऊ देऊ नका. मन व्यग्र राहील.  आणखी वाचा.कुंभ - सर्व दृष्टींनी आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल आणि परिणाम स्वरूप मान प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा.मीन - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला सर्व दृष्टींनी लाभदायक आहे. परोपकाराचे कार्य हातून घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष