शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीकारक दिवस; आर्थिक आवक चांगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 07:22 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: आर्थिक आवक चांगली राहील. वसुलीसाठी जास्त तगादा लावावा लागेल. जमिनीच्या व्यवहारात खबरदारी घेतली पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

वृषभ: महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. मात्र, डोक्याला काही ना काही वैताग राहील. सहजासहजी कामे होणार नाहीत. त्यामुळे थोडा संयम ठेवलेला बरा. नोकरीत प्रगती होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मिथुन: दगदग होईल अशी कामे करू नका. अनाठायी खर्च झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वेळ आणि पैसा खर्च होईल. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कर्क: नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काही फायदे होतील. कुणी एखादा प्रस्ताव दिला तर त्याचा अंतस्थ हेतू काय हे लक्षात घ्या. कधी कधी वरकरणी फायदा दिसत असला तरी प्रत्यक्षात वेगळेच असते. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल.

सिंह: नोकरीत बदल होतील. कामाचे स्वरुप बदलेल. कामाचा ताण वाढेल. धावपळ होईल. घरी लोकांची ये-जा चालू राहील. आराम करण्यास वेळ मिळणार नाही. मात्र, यश मिळाल्याचे समाधान वाटेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या: परिस्थिती हळूहळू प्रगतीपथावर येईल. मात्र, काही कामे पूर्ण करताना अडचणी येतील. सबुरीने वागण्याची गरज आहे. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना तुमची माहिती सांगू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. 

तूळ: महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. फार दगदग करू नका. वाहने जपून चालवा. काम लगेच पूर्ण झाले पाहिजे, असा अट्टाहास करणे सध्याच्या परिस्थितीत योग्य ठरणार नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. 

वृश्चिक: जीवनसाथीची काळजी घ्या. वादविवाद टाळा. व्यवसायात विक्री चांगली राहील. महत्त्वाच्या कामातील अडचणी कमी होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. महत्त्वाच्या कामात तुमच्या नावाचा विचार केला जाईल. 

धनु: धनलाभाच्या संधी चालून येतील. आर्थिक फायदे होतील. आरोग्याची काळजी घ्या. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी सख्य राहील. जुने स्नेही भेटतील. त्यांच्याशी गप्पाटप्पा होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. 

मकर: ग्रहमानाची बऱ्यापैकी साथ राहील. सगळे काही मनासारखे घडणार नाही; पण तरीही ताण कमी राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घ्या. फार धावपळ करू नका. 

कुंभ: नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. थोडे मुत्सद्दीपणाने वागून वेळ निभावून नेण्याची गरज आहे. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमात असणाऱ्यांना गैरसमजांना तोंड द्यावे लागेल. 

मीन: आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात अचानक बदल होऊ शकतात. काही अडचणी येतील. फार मोठे धाडस करू नका. भावंडांशी गैरसमज होतील. वादाचे प्रसंग येतील. जमिनीचे व्यवहार पार पडतील.

- विजय देशपांडे 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य