शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०८ मार्च २०२२: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; नोकरदारांना अनुकूल दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 07:24 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. महत्त्वाच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. उन्हामुळे त्रास होणार नाही, याची थोडी काळजी घ्या. सरकारी कामे पूर्ण होतील. त्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

वृषभ: खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मौजमजा करण्यासाठी खर्च कराल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वाहने जपून चालवा. प्रवासाचे योग येतील. प्रवासात अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. नोकरीत प्रगती होईल.

मिथुन: विविध प्रकारचे लाभ होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च होतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दुपारच्या आत महत्त्वाचे काम पूर्ण केले पाहिजे. प्रवास शक्यतो टाळा. मनात काळजीचा विचार राहील. अचानक फायदा होईल.

कर्क: नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. चांगली बातमी कानावर पडेल. घरी पाहुणे येतील. धावपळ सुरू राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्याला गोडवा राहील. एखाद्या कारणाने थोडा मनस्ताप सहन करावा लागेल. रागाला आवर घाला.

सिंह: भाग्याची चांगली साथ राहील. अचानक प्रवास करावा लागेल. प्रसिद्धी, मान, सन्मान मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. अचानक मोठी संधी चालून येईल. नोकरीत सामान्य परिस्थिती कामाचा ताण वाढेल. घरी पाहुणे येतील. 

कन्या: महत्त्वाच्या कामात अडचणी राहतील. ग्रहमानाची विशेष अनुकूलता राहणार नाही. त्यामुळे फार विचार करण्यापेक्षा संयम ठेवणे योग्य ठरेल. वाहने जपून चालवा. काहींना अचानक धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीच्या कलाने घ्या.

तूळ: महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. अन्यथा अडचणी वाढतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. अचानक मोठी संधी मिळेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. वाहन जपून चालवा. प्रवास शक्यतो टाळा.

वृश्चिक: आरोग्याची काळजी घ्या. शत्रू डोके वर काढतील. मात्र, आपण त्यांना पुरून उराल. नोकरीत प्रगती होईल. तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मोठी जबाबदारी अंगावर घ्यावी लागले. घरी आल्या-गेल्याची वर्दळ राहील. जवळचा प्रवास होईल.

धनु: काहींना अचानक प्रवास करावा लागेल. धनलाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. विविध प्रकारचा लाभ होईल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. आवडते पदार्थ, गोडधोड खाण्यास मिळेल. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घेणे योग्य ठरेल. 

मकर: घरी पाव्हण्या-रावळ्यांची लगबग राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नोकरीत अचानक बदल होईल. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. प्रेमात यश मिळेल. जीवनसाथीची साथ राहील. 

कुंभ: जवळचे प्रवास घडून येतील. व्यवसायात चांगली विक्री होईल. सतत कार्यरत राहाल. भावंडांशी गैरसमज होतील. घरी काही कारणाने वाद होतील. नोकरीत बदलीची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जीवनसाथी साथ देईल.

मीन: अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचा कायदेशीर सल्ला मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात मजेत वेळ जाईल. महत्त्वाच्या कामात धावपळ करावी लागेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. 

- विजय देशपांडे 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य