शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २९ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींची येणी वसूल होतील, आर्थिक आवक उत्तम राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 07:25 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. चांगली साथ राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कामाचा ताण कमी राहील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. योग्य आणि हितचिंतक व्यक्तींचा सल्ला मिळेल.

वृषभ: आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. जीवनसाथीशी वाद होऊ शकतात. नोकरीत गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कुणाला टाकून बोलू नका. प्रवासात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. 

मिथुन: मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल. काहींना प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. जोडीदाराची काळजी घ्या. आर्थिक आवक सामान्य राहील. 

कर्क: धावपळीचा दिवस राहील. विविध कामांमध्ये व्यस्त राहाल. घरी पाहुणे येतील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मुलांच्या अडचणी समजून घ्या. जोडीदार तुमच्या कामात मदत करेल. तब्येतीची काळजी घ्या. थोडा आरामासाठी वेळ काढा.

सिंह: जवळचे प्रवास करावे लागतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वाद होतील. घरात किरकोळ तणाव राहील. जोडीदाराशी काही कारणाने गैरसमज होतील. 

कन्या: आर्थिक आवक मनासारखी राहील. जुनी येणी वसूल होतील. वडिलोपार्जित मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांशी थोडे गैरसमज होऊ शकतात. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. तुमच्या शब्दांचा मान राखला जाईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. 

तूळ: मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील. विविध कामांमध्ये यश मिळेल. जोडीदाराशी गोडीगुलाबीने वागणे आवश्यक आहे. भावंडांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल. आर्थिक आवक उत्तम राहील. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे तपासून घ्या. 

वृश्चिक: आर्थिक आवक चांगली राहील. वसुलीची कामे सकाळच्या प्रहरात केली तर चांगले राहील. महत्त्वाच्या कामात दगदग होईल. बराच वेळ जाईल. प्रवास करावा लागेल. वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या. कायद्याची बंधने पाळा. जोडीदाराशी संभाषण करा. 

धनु: अनुकूल परिस्थिती राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. विविध प्रकारचे आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. योग्य सल्ला मिळेल. जोडीदाराचे मोलाचे सहकार्य मिळेल. त्यामुळे जोडीदाराचे महत्त्व समजेल. भावंडांशी संबंध सुधारतील. 

मकर: नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. नोकरदारांच्या जबाबदारीत बदल होऊ शकतात. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता राहील. त्यामुळे गृहिणींची धांदल उडेल. आर्थिक आवक चांगली राहील. जोडीदार तुमची काळजी घेईल. घरातील कामांचा आढावा घ्या. 

कुंभ: भाग्याची उत्तम साथ राहील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. धार्मिक यात्रा, देवदर्शन घडेल. नोकरीत थोडा संयम ठेवलेला बरा. आर्थिक स्थिती चांगली राहील. महत्त्वाचे निरोप येतील. कामातील कागदोपत्री पूर्तता सहज पूर्ण होईल. 

मीन: विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र, महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. घरात सदस्यांशी समन्वय राहील. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. पूजापाठ करण्यात मन रमेल.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य