Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, १५ जानेवारी २०१९
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 12:57 IST2019-01-15T12:56:38+5:302019-01-15T12:57:11+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, १५ जानेवारी २०१९
मेष राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शनि त्रिकोण आणि चंद्र-नेपच्यून शुभयोग यांच्या सहकार्याने आपल्या कार्यपथावरील प्रवास सुरू ठेवतील. अल्पकाळात त्यात गतिमानता येईल. व्यापार, प्रवास, अधिकार अशी कार्यकेंद्रे राहतील.
जन्म नाव - अ, ल, ई अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
.........
आजचं पंचांग
मंगळवार, दि. १५ जानेवारी २०१९
भारतीय सौर २५ पौष १९४०
मिती पौष शुद्ध नवमी २४ क. ४५ मि.
आश्विनी नक्षत्र १३ क. ५६ मि. मेष चंद्र
सूर्योदय ०७ क. १६ मि.
सूर्यास्त ०६ क. २० मि.
मकर संक्रांती
...........
दिनविशेष
* सेनादिन - Army Day
१९२६ - कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म
१९२९ - गांधीवादी नेता मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म
१९३१ - मराठी कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म
१९४७ - पत्रकार प्रितिश नंदी यांचा जन्म
१९५६ - भाषाशास्त्रज्ञ तारापोरवाला इराच जहांगीर सोराबजी यांचं निधन
१९५६ - बसपाच्या नेत्या मायावती यांचा जन्म
१९७१ - चित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांचे निधन
२०१४ - कवी, विचारवंत दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन