शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 15 मार्च, 2022; काम शक्यतो पुढे ढकला, लॉटरीचे तिकीट घेऊन पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 07:17 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...  

मेष- कामात उत्साह राहील. व्यवसायात भरभराट होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत बदल होऊ शकतात. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल. फायद्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.

वृषभ- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. आपल्या आवडीचे पदार्थ ताटात दिसतील. बोलण्यात संयम राखण्याची गरज आहे. काहीना प्रवास करावा लागेल.

मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. नोकरीत चांगली स्थिती राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. कामात उत्साह राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यवसायात विक्री चांगली राहील.

कर्क- कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. कामे करताना आराम करण्यासाठी पण थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. काही अडचणी येतील. पण, संयम सोडू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.

सिंह- ओळखीचा फायदा होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात अभिनव उपक्रम हाती घेतले जातील. आपल्या आवडीचे काम करता येईल. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला.

कन्या- राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे याचा प्रत्यय येताना दिसेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथींशी सूर जुळतील. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होईल. मुलांना यश मिळेल. धनलाभ होईल.

तूळ- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. तुमचा शब्द वाया जाणार नाही. लोक तुमचा मान राखतील. घरात लगवग राहील. लोकांची ये-जा चालू राहील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

वृश्चिक- ग्रहमान अनुकूल राहील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. नवीन जवाबदारी अंगावर पडेल. व्यवसायात सतत कार्यरत राहावे लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. काही आवश्यक खर्च करावा लागेल. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल.

धनू- लोकांच्या भेटीगाठी होतील. मध्यस्थी करण्यासाठी वेळ द्याल. आपला सल्ला योग्य ठरेल. नोकरीत वादापासून दूर राहा. अडचणीतून मार्ग निघेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही.

मकर- धार्मिक कार्यात भाग घ्याल. स्वतःहून लोकांना सल्ला देऊ नका. मुलांशी संवाद साधला पाहिजे. तुमच्या चांगूलपणाचा कुणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

कुंभ- आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. घरातील कागदपत्रे नीट लावून ठेवा. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मीन- मौजमजा करण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च कराल. कागदपत्रांवर सह्या करताना खबरदारी घ्या. मनात आनंदी विचार राहतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येईल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष