शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२२; 'या' राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा योग, विविध मार्गांनी मिळेल पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 07:28 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १८, १९४४. तिथी चैत्र शुक्ल सप्तमी. (रात्री ११.०६ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र : दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ०१.४३ पर्यंत आर्द्रा. त्यानंतर पुनर्वसू : रास - मिथून. आज : चांगला दिवस : राहू काळ: दुपारी १०.३० ते १२.००. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. मन मोकळे झाल्यासारखे वाटेल. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. आपली महत्त्वाची माहिती लोकांना सांगू नका. नोकरीत सतत कार्यरत राहताल. नवीन माहिती कळेल, त्याचा भविष्यात लाभ होईल. 

वृषभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल, पण बोलण्यावर संयम ठेवलेला बरा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. तुमचे पारडे जड राहिल. व्यवहारात सावधानता बाळगा. कुणाच्या गोड प्रलोभनाला बळी पडू नका. आर्थिक आवक चांगली राहिल. वेळ वाया घालवू नका. 

मिथून - मनात प्रसन्न विचार राहतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहिल. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. विविध प्रकारचे मान-सन्मान प्राप्त होतील. योग्य व्यक्तीच्या सहवासात याल. 

कर्क - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. तसेच, मनस्ताप सहन करावा लागेल. पूजापाठ जप केल्याने मनाला समाधान वाटेल. नोकरीत वादविवादात पडू नका. आपण भले की आपले काम भले, असे धोरण ठेवा.  

सिंह - सकारात्मक परिस्थिती राहिल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. फटाफट कामे मार्गी लागतील. त्यामुळे, चांगले वाटेल. लोकांची मदत मिळेल, जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. धनलाभाच्यादृष्टीने चांगला काळ. 

कन्या - घरात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्या कामानिमित्ताने गडबड राहिल. सतत कार्यरत राहाल. लोकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. जोडीदार आपल्याला सांभाळू घेईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ - कामाच्या निमित्ताने फिरणे होईल, काहींना परगावी जावे लागेल. प्रसिद्धी मान-सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजुने राहिल. धनलाभाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. 

वृश्चिक - नोकरीत वादविवादापासून दूर राहा. दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहिल. व्यवसायात विक्री चांगली होईल. गाडीची कागदपत्रे सांभाळून ठेवा. मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा. 

धनू - व्यवसायात विक्री चांगली होईल. आर्थिक उलाढाली जपून करा. मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ द्या. नोकरीत अनुकूल वातावरण राहिल. महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी व्हाल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहिल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. 

मकर - धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती राहिल. थोडे प्रयत्न केले तर पैसे मिळतील. महत्त्वाचे निरोप येतील, आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. कामाचा व्याप राहिल. मात्र, त्यातून मार्ग काढाल. 

कुंभ - संयमाने वागण्याची गरज आहे, स्वत:बद्दल नको तेवढा आत्मविश्वास बाळगू नका. तटस्थपणे विचारपूर्वक निर्णय घ्या. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. 

मीन - धनप्राप्तीचे योग आहेत. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल, अवांतर खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जीवनसाथी चांगली साथ देईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. महिलांनी वेळेचे नियोजन नीट करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१