शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२२; तरुणाईला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल, जीवनसाथी सांभाळून घेईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:43 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १४, १९४४. तिथी चैत्र शुक्ल तृतीया. (दुपारी १.५६ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र : दुपारी २.२८ पर्यंत भरणी. त्यानंतर कृतिका रास : रात्री ९.०१ पर्यंत मेष. त्यानंतर वृषभ. आज : चांगला दिवस. गौरी तीज, राहू काळ : सकाळी ७.३० ते ०९.००. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- आर्थिक आवक चांगली राहिल. मनासारखा लाभ होईल, आपली गोपनीय माहिती योजना ज्याला-त्याला सांगत बसू नका. कामाचे नियोजन नीट करा म्हणजे ताण वाढणार नाही. जे काम कराल ते आत्मविश्वासाने करा. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. 

वृषभ- जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईन, मर्जीनुसार वागेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काही गैरसमज होतील. भावनेच्या भरात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. एखाद्या कामासाठी चिकाटीने प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. 

मिथुन- वेळ वाया घालवू नका, स्वत:ला सतत कार्यरत ठेवणे आवश्यक आहे. असेल माझा हरी तर देईल खाटेवरी असे धोरण ठेवाल तर अडचणीत याल. घरासाठी वेळ द्यावा लागेल. अडचणी येतील आणि त्या दूरही होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. 

कर्क- नोकरीत कामाचा ताण वाढेल, मात्र लोक तुम्हाला सहकार्य करतील. तुमच्या बोलण्यात गोडवा असू द्या. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्यात माधुर्य राहिल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.

सिंह- विविध प्रकारचे फायदे होतील. अनुकूल घटना घडतील. एखाद्या व्यवहारात नुकसान होऊ शकते. थोडी सतर्कता बाळगली पाहिजे. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. जीवनसाथीशी सूर जुळतील. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. 

कन्या - आनंदी दिवस आहे, मन प्रसन्न राहिल. लोकांच्या गाठीभेटी होतील. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नका. मात्र, मालमत्तेची कामे होतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. भेटवस्तू मिळू शकतात. 

तूळ- प्रवासाचा योग येईल, प्रवासकार्य साधक ठरतील. मात्र, प्रवासाचे नियोजन नीट करा. कामाता उत्साह राहिल. महत्वाच्या कामात यश मिळेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. 

वृश्चिक - मनात आनंदी विचार राहतील. लोकांच्या गाठीभेटी होतील. नवीन ओळखी होतील, एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मानसन्मान मिळेल, आर्थिक आवक मनासारखी राहिल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. 

धनू- धार्मिक कार्यात मन रमेल, प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. काहीतरी नवीन करुन दाखविण्याची जिद्द राहिल. मित्र नातेवाईकांना मदत करावी लागेल. मोठेपणा मिळेल. मात्र, बेपर्वाईने वागू नका. मुलांच्या यशाची वार्ता कानावर पडेल. 

मकर- विविध प्रकारचा लाभ होईल. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बोलून वाईट होऊ नका. नोकरीत अस्थिरता जाणवेल. 

कुंभ- नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी गैरसमज होतील. आर्थिक उलाढाली जपून करा. व्यवहारात स्पष्टता ठेवा. व्यवसायात मोठी गुंतवणूक करताना सल्ला घ्या. 

मीन- जीवनसाथी चांगली साथ देईल. भागिदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मात्र, माहिती घेऊन व्यवहार करा. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च करा.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१