शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २ एप्रिल २०२२; कितीही कामात असला तरी, ऑफिसचा तणाव घरी नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:30 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १२, १९४४. तिथी चैत्र शुक्ल प्रतिपदा. (दुपारी ११.५९ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र : सकाळी ११.२१ पर्यंत रेवती. त्यानंतर अश्विनी रास : सकाळी ११.२१ पर्यंत मीन. त्यानंतर मेष. आज : गुढी पाडवा. नववर्ष प्रारंभ, राहू काळ : सकाळी ९ ते १०.३०. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- आर्थिक आवक चांगली राहील. कार्यालयातील तणाव घरी आणू नका. स्थिर चित्ताने काम करण्याची गरज आहे. योग्य सल्ला घेऊन महत्त्वाच्या कामांना हात घाला. गुढीपाडव्यापासून सुरु होणारे नववर्ष तुमच्या इच्छा पूर्ण करेल, अशा शुभेच्छा.

वृषभ- अतिशय उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. विविध प्रकारचे लाभ होतील, योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील, प्रवास शक्यतो टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. नववर्ष तुमच्या आकांक्षा पूर्ण करो

मिथुन- कामात काही बदल होतील. हे बदल फायदेशीर ठरतील. मात्र, कामाचा ताण वाढेल. सतत व्यस्त राहाल. जुनी येणी वसूल होतील. काहीना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होणार नाही याची काळजी घ्या. नवीन वर्ष आनंदाने साजरे कराल या शुभेच्छा.

कर्क- प्रगतीच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. मात्र, थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत थोडा ताण जाणवेल. जीवनसाथीशी वाद टाळा. मनातील काळजीचे विचार झटकून टाका. नवीन वर्षात तुमची स्वप्ने साकार होतील, या शुभेच्छा.

सिंह- अडचणी दूर होतील. कामाचा ताण निघून जाईल. नवीन कामे करण्यासाठी वेळ काढता येईल. महत्त्वाचे काम दुपारच्या नंतर हाती घ्या. गाडी जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. नवीन वर्षात चांगल्या संधी मिळतील, या शुभेच्छा.

कन्या - महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. दगदग होईल अशी कामे करू नका, आरामात कामे करा. नवीन वर्ष भरभराट घेऊन येवो ही शुभेच्छा.

तूळ- महत्त्वाचे काम दुपारनंतर हाती घेणे योग्य ठरेल. तोपर्यंत कामाची पूर्वतयारी करून ठेवा. तब्येतीकडे लक्ष द्या. कामे करण्याची घाई करू नका. जीवनसाथीच्या मर्जीनुसार वागणे इष्ट ठरेल. नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो हीच शुभेच्छा.

वृश्चिक - व्यवसायात विक्री चांगली होईल. स्पर्धकांना मागे टाकाल, दगदग, धावपळ होईल. कामाचा ताण राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास शक्यतो टाळा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन वर्षात स्वप्ने पूर्ण होतील या शुभेच्छा.

धनू- प्रवास शक्यतो टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहावे. घरात आनंदी वातावरण राहील, मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत तुमच्या बाजूने परिस्थिती राहील. नवीन वर्षात भरभराट होईल अशा शुभेच्छा.

मकर- घरी लोकांची ये-जा चालू राहील. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय साधने आवश्यक आहे. गैरसमज करून घेऊ नका. व्यवसायात धाडसी निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घ्या. नवीन वर्षात तुमचे संकल्प सिद्धीस जावोत ही शुभेच्छा.

कुंभ- जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. भावंडांशी गैरसमज होतील. चीजवस्तू जपा. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. आर्थिक बाजू चांगली राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नवीन वर्ष यशदायक ठरो हीच शुभेच्छा.

मीन- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मोठे लाभ होतील, जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र, व्यवहार जपून करा. महागड्या वस्तू खरेदी कराल. आहाराचे तंत्र सांभाळा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष