शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २४ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 07:53 IST

Todays Horoscope 24 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – मुलांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळेल. जवळपासचा प्रवास होईल. प्रसिद्धी, नावलौकीक वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता राहील. घरात आनंदी वातावरण राहील. आर्थिक आवक चांगली राहील. फसवणूक करणाऱ्या लोकांपासून थोडे अंतर राखले पाहिजे

वृषभ – घरी पाहुणे येतील. महिलांची धांदल उडेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. एखाद्या चुकीच्या व्यवहारात तुमचे नाव गोवले जाऊ शकते. त्यामुळे सावधगिरीने वागा. प्रवासात पैशाची उधळपट्टी करु नका.

मिथुन – भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. भागीदाराची मदत मिळेल. एखादा अनपेक्षित फायदा होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील

कर्क – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या. जोडीदाराची चांगली साथ राहील. घरात आनंदी वातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल. तब्येतीच्या बाबतीत बेपर्वाई नको

सिंह – ग्रहमानाची अनुकूलता राहील. भाग्याची साथ राहील. अभ्यासात यश मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. नोकरीत वादाचे प्रसंग येतील. मात्र तुमचा प्रभाव पडेल. मनात आनंदी विचार राहतील. आरोग्य चांगले राहील.

कन्या – नोकरीत अधिकार मिळतील. तुमचे महत्त्व वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवासाचे नियोजन नीट करा. मनात थोडी चलबिचल राहील. मात्र कुणाची तरी मदत, सल्ला मिळेल.

तूळ – धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. भेटवस्तू मिळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. परस्परांचा समन्वय राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या

वृश्चिक – आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिकदृष्ट्या घेतलेले निर्णय योग्य ठरतील. जाणकरांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. नोकरीत बदलीची शक्यता आहे. घरात थोडे गैरसमज होऊ शकतात. एखादा सदस्य नाराज राहील. मात्र वाद टाळा. खाण्यापिण्याची लयलूट राहील.

धनू – भाग्याची उत्तम साथ राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. घरात मिठाई आणली जाईल. आनंदी वातावरण राहील. आर्थिकदृष्ट्या चांगली सुबत्ता राहील.

मकर – आर्थिक बाजू चांगली राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामात फायदा होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. त्यात वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. जीवनसाथीची कदर करा

कुंभ – ग्रहमानाची अनुकूलता राहील. आर्थिक सुबत्ता राहील. विविध प्रकाराचे लाभ होतील. जीवनसाथीला चांगली साथ द्याल. महत्त्वाचे काम होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. मात्र वादविवाद होण्याची शक्यता आहे.

मीन – नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक आवक चांगली राहील. घरात सुबत्ता राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दगदग होईल. तब्येतीच्या काळजी घ्या. खाणेपिणे सांभाळ. साधा आणि सात्विक आहार घ्या  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषhoroscope 2021राशिभविष्य २०२१Zodiac Signराशी भविष्य