Rashi Bhavishya Todays horoscope for 8 April 2021 Engage in social work with friends, family well wishers | Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२१; स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२१; स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल

मेष - श्रीगणेशाच्या कृपेने दिवस शुभ राहील. स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला चांगला जाईल. नवीन कामाच्या योजना आखाल. नोकरदार आणि व्यावसायिकांना दिवस चांगला जाईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. आणखी वाचा

मिथुन- मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील असे श्रीगणेशांना वाटते. शरीराने थकाल आणि आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेशांच्या मते प्रतिकूल परिस्थितीचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून श्रीगणेश सावध राहण्याची सूचना देत आहेत. आणखी वाचा

सिंह - मध्यमफलदायी दिवस. धंदा व्यवसायात मतभेद राहतील. तुमची तब्बेत चांगली राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्या मुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. घरात सुख शांतीचे वातावरण पसरेल. त्यामुळे मनही प्रसन्न राहील. सुखद प्रसंग घडतील. तब्बेत चांगली राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल.  आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. असे गणेशजींना वाटते. अपत्यांकडून शुभ समाचार मिळतील. तुमची प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शांततेत घालवा असे श्रीगणेश सुचवतात कारण मन चिंतीत राहील व संबंधीतांशी पटणार नाही. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. आणखी वाचा

धनु - गूढविद्या आणि अध्यात्मिकता यात तुम्ही आज मग्न राहाल. भावंडांबरोबर चांगले वर्तन राहील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगली वेळ आहे. मित्रमंडळींशी बोलणे होईल. कामात यश मिळेल. तसेच प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. आणखी वाचा  

मकर - आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी यात पैसा अडकवाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. आणखी वाचा

कुंभ - गणेशांच्या सांगण्यानुसार आज तुमचे शरीर आणि मन उत्साही असेल. दिवस लाभदायक आहे. मित्र- कुटुंबियांसमवेत एखाद्या सहलीला जाल. अध्यात्म आणि चिंतन यात प्रगती राहील. मित्र- आप्तेष्ट यांच्याकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आज मन अशांत राहील त्यामुळे एकाग्रता कमी असेल. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. पैसा गुंतवणूकीकडे आज जास्त लक्ष द्या. स्वजनापासून आज तुम्ही दुरच राहा कारण त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rashi Bhavishya Todays horoscope for 8 April 2021 Engage in social work with friends, family well wishers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.