शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ७ एप्रिल २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, खाण्या-पिण्याची चंगळ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:18 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १७, १९४४. तिथी चैत्र शुक्ल षष्टी. (रात्री ८.३३ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र : रात्री १०.४१ पर्यंत मृग. त्यानंतर आर्दा : रास - सकाळी ९.१० पर्यंत वृषभ, त्यानंतर मिथून. आज : चांगला दिवस : राहू काळ: दुपारी १.३० ते ३.००. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहिल. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मात्र, एखादी व्यक्ती अपेक्षा भंग करू शकते. त्यामुळे, थोडे सावध राहा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत ताण राहिल. 

वृषभ - नोकरीत चांगल्या घटना घडतील. तुमचे महत्त्व वाढेल, सहकारी वर्गाची साथ लाभेल. मात्र, वाहवत जाऊ नका. कुणी तुम्हाला मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल. सरकारी कामात यश मिळेल. धनलाभाच्यादृष्टीने चांगला काळ. खाण्या-पिण्याची चंगळ राहिल. 

मिथून - ग्रहमान अनुकूल राहील. मनात आनंदी विचार राहतील. मौजमजा करण्यासाठी वेळ देता येईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहिल. तुमचे पारडे जड राहिल. जीवनसाथी साथ देईल. किरकोळ अडचणी दूर होतील. नावलौकिक वाढणाऱ्या घटना घडतील. 

कर्क - संमिश्र ग्रहमान राहील. मनात काळजीचे विचार राहतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवासात दगदग होईल, नोकरीत संघर्ष करावा लागेल. पण अनेकांना तुमची बाजू पटेल. खर्चावर नियंत्रण ठेवा, सकारात्मक विचार करा. 

सिंह - अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. मनात प्रसन्न विचार राहतील. कामात उत्साह राहिल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. आर्थिक आवक उत्तम राहिल. पर्यटनानिमित्त प्रवास होईल. 

कन्या - नोकरीत नवीन संधी मिळतील. कामानिमित्त फिरणे होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. जीवनसाथीची चांगली साथ राहिल. आरोग्याची चांगली काळजी घ्या, सात्विक व हलका आहार घ्या. घरी पाहुणे येतील, त्यामुळे घरात लगबग राहिल. 

तूळ - अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामांना हात घालण्यास हरकत नाही. लोकांचे सहकार्य मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. नावलौकिक वाढविण्याच्या घटना घडतील. आर्थिक बाजू चांगली राहिल. 

वृश्चिक - तणावाचे व्यवस्थापन नीट केले पाहिजे, महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. व्यवसायात चांगली स्थिती राहिल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीत संमिश्र परिस्थिती राहिल. वाहने जपूर चालवा, प्रवास शक्यतो टाळा. 

धनू - नोकरीत चांगली परिस्थिती राहिल. तुमचं महत्त्व वाढेल, घरात तुमच्या मर्जीनुसार निर्णय घेतले जातील. व्यवसायात बरकत राहिल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहिल. मुलांशी संवाद साधला पाहिजे.  

मकर - दगदग होईल अशी कामे करू नका. तब्येतीची काळजी घ्या, महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयम सोडू नका, नोकरीत लोकांचे सहकार्य राहिल. मात्र, गैरसमज होतील. एखादा अनुकूल निर्णय होईल. आर्थिक आवक चांगला राहिल. 

कुंभ - मुलांचे कौतूक होईल, त्यांना योग्यतेनुसार संधी मिळेल. जवळपासचा प्रवास करावा लागेल. प्रेम प्रकरणात वाहवत जाऊ नका. कुणी मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल, सावधपणे वागलेले बरे

मीन - घरी पाहुणे येतील. लोकांची ये-जा चालू राहिल. त्यात बराच वेळ जाईल. आर्थिक बाजू चांगली राहिल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१