Rashi Bhavishya Todays horoscope 5 April 2021 Stay away from harmful thoughts transactions and planning | Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२१; हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२१; हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा

मेष - हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अन्यथा आळस आणि दुःख वाढेल. तब्बेत यथा-तथाच राहील. कार्ये व्यवस्थित पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आणखी वाचा

वृषभ - सरकार विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. नवे कार्य हाती घेऊ नका. तब्बेत बिघडेल. मनातही काळजी राहील. आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. आणखी वाचा

कर्क - खूप मोठया आर्थिक लाभाची प्राप्ती होईल असे गणेशजी सांगत आहेत. व्यावसायिकांना दिवस लाभप्रद. कार्य साफल्यामुळे बढती आणि यशाची प्राप्ती होईल. दुपारनंतर मनोरंजनाच्या हेतूने अन्यत्र जाण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

सिंह - साहित्य आणि कलेविषयी गोडी वाटेल असे गणेशजी सांगतात. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थ राहाल. दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. आणखी वाचा

कन्या - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्याकडे लक्ष द्या असा गणेशजींचा सल्ला आहे. आईची तब्बेत बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानीचे योग आहेत. आणखी वाचा


तूळ - श्रीगणेश असा संकेत देतात की आजचा दिवस नवकार्य प्रारंभास अनुकूल आहे. आध्यात्म आणि गूढ रहस्यांकडे आकर्षण राहील. दुपारनंतर मात्र आनंद आणि उत्साहाचा अभाव राहील.  आणखी वाचा


वृश्चिक - गणेशजी म्हणतात की कुटुंबातील व्यक्तींशी मने दुखावण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मन द्विधा असेल. कामाचा व्याप वाढेल.  आणखी वाचा


धनु - आज आपणाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत गणेशजी देतात. कोणा स्नेह्याकडे मंगल कार्यानिमित्त जावे लागेल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. आणखी वाचा  


मकर - कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अस्वस्थ मन, शरीर- प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष दया. बोलणे आणि व्यवहार संयमाने करा. वाहन जपून चालवा. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल. आणखी वाचा


कुंभ - आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. अपरिचितांशी परिचय होतील. परंतु दुपारनंतर तब्बेत बिघडेल. परिवारात मनस्तापामुळे वातावरण दूषित होईल. आणखी वाचा


मीन - आज आपले विचार ठाम व पक्के नसतील असे गणेशजी सांगतात. वरिष्ठांकडून व्यवसायात लाभ होतील. पदोन्नती मिळेल. व्यापारविषयक नियोजन कराल. कुटुंबात सुखसमाधान नांदेल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होतील. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rashi Bhavishya Todays horoscope 5 April 2021 Stay away from harmful thoughts transactions and planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.