शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य २० एप्रिल २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला दिवस, नवीन नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 07:40 IST

Today Horoscope In Marathi 20 april 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या तुमचं आजचं राभीभविष्य...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ३०, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण चतुर्थी (दुपारी १.५३ पर्यंत), श्री. शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र- रात्री ११४१ पर्यंत ज्येष्ठा. त्यानंतर मूळ. रास- रात्री ११.४१ पर्यंत वृश्चिक. त्यानंतर धनू. आज- सामान्य दिवस. राहू काळ- दुपारी १२ ते १.३० (राहू काळात महत्वाची कामे टाळा)

मेष- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल अशी कामे करू नका. एखादे अचाट साहस करू नका. कायद्याची बंधने पाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा मनस्ताप होईल. 

वृषभ- नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. लोकांची मदत मिळेल. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. कामात उत्साह राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. जोडीदाराच्या सल्ल्याा फायदा होईल. आध्यात्मिक प्रगती होईल. उपासना करण्यात वेळ जाईल. 

मिथुन- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. लोकांच्या संपर्कात याल. त्यांची मदत मिळेल. महत्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. कामाचे योग्य नियोजन करुन ठेवा. काम करताना अट्टाहास करू नका. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. आवक सामान्य राहील. 

कर्क- मुलांना विद्याभ्यासात सफलता मिळेल. त्यांचे कौतुक होईल. एखाद्या चांगल्या कामासाठी पुढाकार घ्याल. लोकांची दुवा मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. 

सिंह- नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. नवीन कार्यक्षेत्रात ओळख होईल. नोकरीत एखाद्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. नवीन नोकरीची संधी मिळेल. मुलाखतीचे बोलावणे येऊ शकते. 

कन्या- व्यवसायात भरभराट होईल. ग्राहकसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. नातेवाइकांच्या संपर्कात राहाल. नोकरीत संयमाने वागणे आवश्यक आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. कायद्याची बंधने पाळा. आवडत्या छंदासाठी वेळ द्या. 

तूळ- ग्रहमान अनुकूल राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. मनासारखे भोजन मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुले अभ्यासात प्रगती करतील. त्यांच्या प्रगतीचा तटस्थपणे आढावा घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. आराम करा. 

वृश्चिक-  महत्वाच्या कामात सफलता मिळेल. लोक सहकार्य करण्यासाठी पुढे येतील. कामात उत्साह राहील. कामे आटोक्यात येईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. जोडीदार चांगली साथ देईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. 

धनू- नोकरीत प्रगतीला पोषक वातावरण राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. मानसन्मान मिळेल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. एखाद्या व्यवहारात अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. नातेवाईक भेटतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. 

मकर- नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. एखादी अपेक्षित चांगली घटना घडेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेचे व्यवहार मनासारखे होतील. त्यातून फायदा होईल. भेटवस्तू मिळतील. मनाला आनंद मिळेल अशा घटना घडतील. 

कुंभ- घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. सदस्यांचा एकमेकांशी समन्वय राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. 

मीन- ग्रहमानाची साथ राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. चैनीवर खर्च करण्यासाठी कल राहील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. अनुकूल वातावरण राहील. कामात उत्साह राहील. मनात आनंदी विचार राहतील. 

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य