शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

सिंह राशिभविष्य 2021 : आपल्या कष्टांवर विश्वास ठेवल्यास ह्या वर्षी गाठू शकाल मोठा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 15:08 IST

Leo horoscope 2021: परदेशी जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष अनुकूल असून त्यांना तसे प्रवास करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील.

सिंह राशीचे जातक २०२१ ची सुरवात मोठ्या आत्मविश्वासाने करतील. हाच आत्मविश्वास टिकवून  ठेवल्यास ह्या वर्षात मोठा पल्ला आपण गाठू शकाल. ह्या वर्षी खर्चात वाढ जरी झाली तरी प्राप्तीत सुद्धा वाढ होणार असल्याने तक्रारीस काहीच वाव राहणार नाही. कुटुंबात काही तणाव निर्माण झाल्याने आपणास नैराश्यास सामोरे जावे लागेल. ह्या वातावरणामुळे आपण मनाने कुटुंबापासून दूर व्हाल, परंतु हा समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग नसून कुटुंबियांशी चर्चा करून समस्या सोडविता येतात हे आपण ध्यानात ठेवावे. तसे केल्यासच समस्यांवर तोडगा निघू शकेल. सिंह राशीच्या जातकांना ह्या वर्षी मित्रांचे सहकार्य मिळू शकेल. नोकरीच्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारच्या आडमार्गापासून दूर राहून आपल्या स्वकष्टावर विश्वास ठेवूनच वाटचाल करावी लागेल. अखेर हाच आत्मविश्वास आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरणार आहे. परदेशी जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष अनुकूल असून त्यांना तसे प्रवास करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. २०२१ दरम्यान कोणत्याही प्रकारच्या भांडणात आपण हस्तक्षेप केल्यास डाव आपल्यावरच उलटून त्याचा आपणास त्रास होण्याच्या शक्यतेमुळे आपण अशा स्थितीत मध्यस्थी करणे टाळावे. आपण जर सक्रिय राजकारणात असाल तर ह्या वर्षी आपल्या कार्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपल्या हातून चांगली कामे यशस्वीपणे व्हावीत म्हणून आपले आरोग्य उत्तम असणे गरजेचे असून त्यासाठी आपणास ह्या वर्षी आपल्या आरोग्याची योग्य प्रमाणात काळजी घ्यावी लागेल.

वैवाहिक जीवन (Leo,Love and relationship Horoscope 2021)

प्रेमसंबंधांच्या बाबतीत सिंह राशीच्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात सामान्यच राहणार असल्याने आपणास जीवनातील काही आवश्यक बाबींवर लक्ष द्यावे लागेल. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीस आपल्या विश्वासात घेऊन त्या व्यक्तीच्या समस्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपण जर तसे करू शकलात तर २०२१ च्या मधल्या भागात आपणास त्याचे चांगले परिणाम अनुभवता येतील. ह्या दरम्यान आपल्या प्रिय व्यक्तीशी आपली जवळीक वाढून नात्यात गोडवा येईल. एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण घालवून वैवाहिक जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकाल. सिंह राशीच्या विवाहित जातकांसाठी २०२१ चे वर्ष वैवाहिक जीवनात चढ - उतार आणणारे आहे. विशेषतः आपल्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असून आपणास जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घेऊन संबंधातील गोडवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा! 

आर्थिक (Leo,Finance Horoscope 2021)

सिंह राशीच्या जातकांसाठी २०२१ च्या सुरवातीस खर्चात वाढ होणार असल्याने वर्षाची सुरवात आर्थिक बाबतीत मध्यमच असणार आहे. आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्यात चांगली बाब म्हणजे कोणत्याही कारणाने आपले कार्य खोळंबून राहणार नसल्याने आपणास काही त्रास होणार नाही ही होय. वर्षाचा मध्य भाग धन प्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. ह्या दरम्यान आपली आर्थिक स्थिती प्रबळ करण्याच्या अनेक संधी आपणास उपलब्ध होतील. जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर हे महिने अनुकूल फलप्राप्ती करून देणारे असल्याने ह्या दरम्यान आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. असे असले तरी फेब्रुवारी, मे व सप्टेंबर हे महिने काहीसे निर्बली असल्याने काळजी घ्यावी. सिंह राशीच्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष आर्थिक गुंतवणूक करण्यास अनुकूल नसल्याने ह्या वर्षात आर्थिक गुंतवणूक करताना खूपच विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. असे असले तरी आपण दीर्घकालीन गुंतवणूक करू शकाल.

नोकरी, व्यवसाय, करिअर (Leo,Job-Career-Business Horoscope 2021)

सिंह राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. आपणास कष्टाचे यथोचित फळ मिळेल. असे असले तरी कष्ट कमी करण्याच्या नादात जवाबदारी टाळण्याचे विचार आपल्या मनात येत राहतील, जे आपल्यासाठी नुकसानदायी ठरणारे असल्याने त्यांना मनातून काढून आपल्या कामावर आपणास लक्ष केंद्रित करावे लागेल. वर्षाचे सुरवातीचे महिने नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम आहेत. वर्षाचा मधला भाग त्यांच्यासाठी मध्यम फलदायी असून वर्षाचे अखेरचे महिने आपली ओळख निर्माण करण्यात मदतरूप ठरणारे आहेत. सिंह राशीच्या व्यापाऱ्यांना २०२१ हे वर्ष विदेशी संपर्कातून लाभ मिळवून देण्यास अनुकूल आहे. आयात - निर्यातीशी संबंधित व्यापारातून आपणास मोठा लाभ होऊ शकतो. असे असले तरी व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपले नुकसान होऊ नये म्हणून आपण जेथे व्यापारी गुंतवणूक करू इच्छिता त्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आपणास घ्यावा लागेल. व्यापाराच्या दृष्टीने वर्षाचा मधला भाग अधिक अनुकूल आहे. 

शिक्षण (Leo,Education Horoscope 2021)

सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२१ हे वर्ष खूपच चांगले आहे. आपल्या शैक्षणिक जीवनात आपणास उत्तम परिणाम मिळू शकतील. आपण जे काही परिश्रम कराल त्याचे यथोचित फळ आपणास ह्या वर्षी मिळणार आहे. आपण जर एखाद्या स्पर्धेत सहभागी झालात तर त्यात सुद्धा आपणास यश प्राप्त होऊ शकेल. शासकीय नोकरी मिळविण्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील. आपणास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. उच्च शिक्षण  घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाचे सुरवातीचे दोन महिने अत्यंत अनुकूल असल्याने ह्या दरम्यान त्यांना आपली श्रेष्ठ कामगिरी करून दाखवता येईल. आपणास जर परदेशी विश्वविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल तर त्यासाठी वर्षाचा मधला भाग उपयुक्त ठरेल. सिंह राशीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी २०२१ दरम्यान आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा.

आरोग्य  (Leo,Health Horoscope 2021)

सिंह राशीच्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून सामान्य फलदायी ठरणारे आहे. एकीकडे आपली प्रकृती सुदृढ राहील व मानसिक चिंता सुद्धा दूर राहतील, तर दुसरीकडे एखादी अशी काही समस्या निर्माण होईल. जी पुढे जाता उग्र रूप धारण करू शकेल. ह्यात मुख्यत्वे पोट व मुत्राशयाशी संबंधित विकार होण्याची शक्यता असून आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन त्यानुसार आपली दिनचर्या नक्की करावी. सिंह राशीच्या जातकांची प्रकृती २०२१ च्या सुरवातीच्या महिन्यांच्या तुलनेत मधल्या भागात चांगली राहील व अखेरच्या महिन्यात ती उत्तमच राहील. ही एक दिलासा जनक बाब असेल.

टॅग्स :horoscope 2021राशिभविष्य २०२१