शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Horoscope : आजचं राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2022, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 07:33 IST

Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष - जवळचा प्रवास होईल, भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहिल. एखादा हट्ट पुरवावा लागेल, जीवनसाथी साथ देईल. 

वृषभ - अचानक धनलाभ होण्याची शक्यता. मनासारखे भोजन मिळेल, जमीन व्यवहारात फायदा होईल. मनावरचा ताण हलका होईल. वाहन जपून चालवा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. बहिणी भाऊ यांचेशी थोडे मतभेद होऊ शकतात.  मिथुन - तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. योग्य तसा प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वादापासून दूर राहा. संयमाने वागणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनासाथीशी मधूर संबंध राहतील.  

कर्क - महत्त्वाच्या कामात अडचण येईल. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. प्रवास करावा लागेल, प्रवासात काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या, खाण्या-पिण्याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.

सिंह - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजुने राहिल. महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल. प्रसिद्धी नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. घरात गैरसमज होतील.  

कन्या - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. कामाता चांगला बदल होईल. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. फायदा होईल, घरी पाहुणे होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहिल. मुलाच्या यशाची वार्ता कानावर पडेल. जीवनसाथीचे मन दुखवू नका

तूळ - भाग्याची साथ चांगली राहिल. महत्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. प्रगतीचा रथ वेगाने धावेल. व्यवसायात बरकत राहिल. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. 

वृश्चिक - जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र, कागदपत्रे वाचून घ्या. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. महत्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा

धनू - महत्वाच्या कामात यश मिळेल, सगळ्या अडचणी दूर होतील. मन प्रसन्न राहिल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. विवाहोत्सुकांचा विवाह ठरेल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. जीवनसाथीशी सूर जुळेल. मालमत्तेच्या कामात गती मिळेल.

मकर - खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक, आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयम सोडू नका. आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेता येईल. पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करु नका. घरात किरकोळ कारणावरुन कुरबूर होईल. 

कुंभ - नोकरीतील अस्थिरता कमी होईल. ताण राहणार नाही, आर्थिक आवक चांगली राहिल. अचानक एखाद्या सौद्यात फायदा होईल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल. सुखसोयी वाढवून मिळतील. मुलांचा प्रवासकार्य साधक ठरेल. 

मीन - घरी पाहुणे येतील, खाण्या-पिण्याची चंगळ राहिल. सरकारी कामे मार्गी लागतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू मिळतील. नोकरीत अनुकूल बदल होईल. आर्थिक आवक चांगली राहिल.  

टॅग्स :horoscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य