Horoscope - October 28, 2020: Be patient with anger; The planetary association of disagreement or misunderstanding with anyone | राशीभविष्य - २८ ऑक्टोबर २०२०: संताप अन् वाणीवर संयम ठेवा; कोणाशीही मतभेद अथवा गैरसमज होण्याचे ग्रहयोग

राशीभविष्य - २८ ऑक्टोबर २०२०: संताप अन् वाणीवर संयम ठेवा; कोणाशीही मतभेद अथवा गैरसमज होण्याचे ग्रहयोग

मेष - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आज अनुकूल दिवस आहे. शांत मनाने आज सारी कामे पार पडतील. त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह संचारेल. लक्ष्मीची कृपा असेल. आणखी वाचा 

वृषभ -श्रीगणेश सुचवितात की आजचा दिवस सावधतेने घालवा. तुमचे मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात.  आणखी वाचा 

मिथुन -  श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभप्रद असेल. अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. प्राप्तीसाठी शुभ दिवस. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. आणखी वाचा 

कर्क - आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील बढती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा होतील. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेशांना वटते की आजचा  दिवस तुम्हाला मध्यम फल देणारा जाईल. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्या. धार्मिक किंवा शुभ कार्यात आजचा दिवस जाईल. आणखी वाचा 

कन्या -आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचे श्रीगणेश सांगतात. आरोग्य सांभाळा. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. आज आपला स्वभाव रागीट असेल त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

तूळ – तुमचा आजचा दिवस आनंददायी जाईल. लोकांमध्ये आज तुम्हाला मान-सन्मान मिळेल. 

वृश्चिक - आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा 

धनु -आज प्रवास टाळा कारण पोटाच्या तक्रारी निर्माण होतील असे श्रीगणेश म्हणतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या संबंधी काळजी लागेल. कामे अयशस्वी झाल्याने निराशा येईल. आणखी वाचा 

मकर - शारीरिक स्वास्थ्य आणि मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती आणि उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांबरोबर मतभेद होतील. छातीत वेदना होतील. आणखी वाचा 

कुंभ -मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल कारण मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. घरतील भावंडांबरोबर एखादे नवीन कार्य कराल आणि त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

मीन - श्रीगणेश आपणाला आज खर्चावर संयम ठेवण्याची सूचना देत आहेत. संताप आणि वाणीवर संयम ठेवा. कोणाशीही मतभेद अथवा गैरसमज होतील असे ग्रहयोग आहेत. आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - October 28, 2020: Be patient with anger; The planetary association of disagreement or misunderstanding with anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.