Horoscope - October 21, 2020: Happiness and peace in the family and a conducive atmosphere in the office | राशीभविष्य - २१ ऑक्टोबर २०२०: कुटुंबात सुख- शांती अन् ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण राहील

राशीभविष्य - २१ ऑक्टोबर २०२०: कुटुंबात सुख- शांती अन् ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण राहील

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपणात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून रागावर ताबा ठेवा. कार्यालयात अधिकारी, घरात कुटुंबीय आणि विरोधक यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले.  आणखी वाचा 
 

वृषभ - कामाचा खूप व्याप आणि खाण्यापिण्याची बेपर्वाही यामुळे तब्बेत बिघडेल. वेळेवर जेवण आणि झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल. आणखी वाचा 

मिथुन - मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान- प्रतिष्ठा वाढेल. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल. आणखी वाचा    

कर्क - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा दिवस खुशीचा आणि याशाचा जाईल. कुटुंबात सुख- शांती आणि समाधान राहील. नोकरदारांना ऑफिस मध्ये अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून आणि मातुल घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा    

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांकडे अधिक गोडी लागेल. साहित्य आणि कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती केल्याने प्रेरणा मिळेल. आणखी वाचा    

कन्या -  आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड देण्यास तयार राहावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. तब्बेती विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील व्यक्तींशी खटका उडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा    

तूळ –  श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस आनंददायी राहील. परिवारामधील भाऊ- बहिणींमधले संबंध अधिक चांगले होतील.

वृश्चिक - नकारात्मक मानसिक वृत्ती टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. 'मौनं सर्वार्‍यां साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबातील व्यक्तींशी संघर्ष होणार नाही. आणखी वाचा   

धनु -  आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची, विशेषतः तीर्थयात्रेची शक्यता आहे. आणखी वाचा    

मकर -आज आपण धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांत मग्न राहाल. पूजा- पाठ, धार्मिक कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित आणि कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा    

कुंभ -  नवे काम हाती घेऊ शकाल. श्रीगणेशाची आपणावर कृपा आहे. नोकरी धंद्यात लाभ होतील आणि जादा उत्पन्न मिळेल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा    

मीन -  श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी आहे. कामातील यश आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. आणखी वाचा    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - October 21, 2020: Happiness and peace in the family and a conducive atmosphere in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.