Horoscope - October 20, 2020: Disagreements with family will occu | राशीभविष्य - २० ऑक्टोबर २०२०: कुटुंबीयांसोबत मतभेदाचे प्रसंग घडतील; वर्तन अन् बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज

राशीभविष्य - २० ऑक्टोबर २०२०: कुटुंबीयांसोबत मतभेदाचे प्रसंग घडतील; वर्तन अन् बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज

मेष -   आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. गुप्तशत्रूपासून सावध राहा. रहस्यमय गोष्टीत गोडी वाटेल आणि गूढ विद्येप्रती आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. आणखी वाचा 

वृषभ -   श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. स्वकीय आणि जवळच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या वार्ता येतील. आणखी वाचा    

मिथुन -  आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो नाहक जाणार नाही. आर्थिक लाभाची शक्यता. तब्बेत चांगली राहील. कामात यश मिळेल. आणखी वाचा    

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. मानसिक अशांतता आणि उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचा    

सिंह -  श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा नाही. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला जास्तच भास होतील. मातेचे आरोग्य बिघडेल. आणखी वाचा    

कन्या -   कोणत्याही कामात विचार न करता भाग घेण्यास श्री गणेश तुम्हाला मना करताहेत. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे बनाल. आप्तमित्र यांची भेट होईल. भावंडाकडून फायदा होईल. आणखी वाचा    

तूळ –  श्रीगणेश सांगतात की  आज आपलं मन कोंडीत अडकले जाईल. निर्णय न घेतल्यामुळे नवीन कामे सुरू करणे आपल्यासाठी फायदेशीर राहणार नाही. प्रवास करु नये. तसेच आपल्याला आर्थिक लाभ होईल.  

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रियजनांशी सफल भेटी होतील. आणखी वाचा    

धनु -  आजचा दिवस कष्टप्रद आहे. म्हणून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कुटुंबियांसोबत मतभेदाचे प्रसंग घडतील. स्वभावात रागीटपणा आल्याने कोणाशी वाद घालू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. वर्तन आणि बोलणे यावर संयम ठेवा. आणखी वाचा    

मकर - सामाजिक कार्यांतून लाभ होईल कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतून लाभ होण्याचा आज योग आहे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. आणखी वाचा    

कुंभ -  आज आपल्याला अनुकूल दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. आणखी वाचा    

मीन -   मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांबरोबर सांभाळून कार्य करण्याची सूचना श्रीगणेश देतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. आणखी वाचा    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - October 20, 2020: Disagreements with family will occu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.