Horoscope - March 9, 202; If Gemini did not control her anger today ... | राशीभविष्य - ९ मार्च २०२१; मिथुन राशीने आज रागावर संयम ठेवला नाही तर...

राशीभविष्य - ९ मार्च २०२१; मिथुन राशीने आज रागावर संयम ठेवला नाही तर...

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. आणखी वाचा.

वृषभ - परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्‍यांना चांगली संधी आहे. आणखी वाचा.

मिथुन - निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नका. रागावर संयम ठेवला नाही तर अनिष्ट प्रसंग उद्भवतील.  आणखी वाचा.

कर्क - समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. आणखी वाचा.

सिंह - श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना वाणीवर संयम ठेवा. दैनंदिन कामात विघ्ने येतील.  आणखी वाचा.

कन्या - आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढतील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. आणखी वाचा.

तूळ - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. मनात संवेदनशीलता जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव असेल. आणखी वाचा.

वृश्चिक - नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल. आणखी वाचा.

धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील. आणखी वाचा.

मकर - सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. आणखी वाचा.

कुंभ - आज मन आणिशरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.

मीन- आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. आणखी वाचा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - March 9, 202; If Gemini did not control her anger today ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.